भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने नुकत्याच पार पडलेल्या झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेत शानदार प्रदर्शन केले. आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक ठोकून गिलने झिम्बाब्वेविरूद्धची एकदिवसीय मालिका अविस्मरणीय केली. या शतकी खेळीच्या जोरावर त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा देखील विक्रम मोडीत काढला.
या विक्रमी कामगिरीनंतर शुबमन गिल आणि सचिनची मुलगी सारा तेंडुलकर यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागले. सोशल मीडियावरील युजर्स विविध प्रकारचे मीम्स व्हायरल करत आहेत. तर काही नेटकरी दोघांच्या नात्यात दुरावा आला असल्याचे म्हणत आहेत.
सगळं काही सुरळीत चाललं असताना अचानक सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. त्यामुळे ब्रेकअपच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. मात्र साराने शुबमनची बहिण शहनशील गिलला फॉलो करून सस्पेंस कायम ठेवला आहे. अशा परिस्थितीत दोघांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्या ब्रेकअपच्या बातम्या याआधी देखील आल्या होत्या. मात्र आतापर्यंत ही केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. दोघांनीही याबाबत कधीच अधिकृतपणे वक्तव्य केले नाही तसेच याबाबत भाष्य करणे देखील टाळले आहे. 2019 च्या आयपीएलमध्ये दोघांचीही पहिल्यांदा दखल घेण्यात आली होती.
शुबमन गिल आयपीएल 2019 च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून खेळला होता. या हंगामानंतर गिलने एक रेंज रोवर कार खरेदी केली होती. तेव्हा त्याने नवीन कारसोबत त्याचे काही फोटो शेअर केले होते. त्या फोटोंवर साराने काही कमेंट केल्या होत्या.
साराने हार्टची इमोजी शेअर करताना कमेंटमध्ये लिहिले, 'अभिनंदन.' त्याला उत्तर म्हणून गिलने हार्टचीच इमोजी पाठवून लिहिले, '@सारा तेंडुलकर खूप खूप आभार'. तेव्हापासून सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्या या नात्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.