IPL 2026 : पॉवर प्लेमध्ये टेस्ट इनिंग! ऋतुराज गायकवाडच्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड

या यादीत साई सुदर्शनसह अजिंक्य रहाणेचंही नाव

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर आपलाच निर्णय सार्थ ठरवण्यात ऋतुराज गायकवाड सपशेल अपयशी ठरला.

SRH चा कर्णधार पॅट कमिन्स याच्या गोलंदाजीवर बाद होण्याआधी CSK च्या कर्णधाराने २१ चेंडूचा सामना करताना ७१..४३ च्या स्ट्राईक रेटसह फक्त १५ धावा केल्या. यात त्याला एकही चौकार मारता आला नाही.

चेपॉकच्या मैदानात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पॉवर प्लेमध्ये ११ चेंडूचा सामना करताना त्याने फक्त ९ धावा केल्या.

यंदाच्या हंगामात किमान १०० चेंडूचा सामना केल्यावर १२४.६ च्या स्ट्राईक रेटसह १८२ धावांसह पॉवर प्लेमध्ये सर्वात कमी स्ट्राईक रेटसह धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वलस्थानी पोहचला.

कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातील अंगकृष रघुवंशी या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. यंदाच्या हंगामात त्याने पॉवर प्लेमध्ये १२६.५ च्या स्ट्राईक रेटसह १२९ धावा केल्या आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेही यंदाच्या हंगामात संघाला दमदार सुरुवात करून देण्यात सातत्याने अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. त्याने १२७ च्या स्ट्राईक रेटनं १२३ धावा काढल्या आहेत.

यंदाच्या हंगामात ऑरेंज कॅप शर्यतीत प्रबळ दावेदार असलेल्या साई सुदर्शन याचाही या यादीत समावेश आहे. गुजरातच्या सलामीवीराने यंदाच्या हंगामातील पॉवर प्लेमध्ये १४४.४ च्या स्ट्राईक रेटसह २७० धावा काढल्या आहेत.