टीम इंडियाचा सुपर-८च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ७६ धावांनी पराभव केला. या पराभवाने नेट रन रेटवर परिणाम झाला असून भारताचे सेमीफायनलचे गणित बिघडले.
दक्षिण आफ्रिकेचीही फलंदाजी खराब झाली होती, पण नंतर पिच समजून घेत त्यांनी मोठी धावसंख्या उभारली. याच मुद्द्यावरून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने मत मांडले.
'आमची कामगिरी उत्तम झाली. वेगळ्या पद्धतीच्या पिचवर आमच्या संघाच्या खेळाडूंनी पटकन परिस्थितीचा अंदाज घेतला आणि त्यानुसार आपला खेळ फुलवला याचा आनंद आहे.'
'आमच्या फलंदाजीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही भागीदारी होती. मिलर आणि ब्रेव्हिस या दोघांनी दमदार फलंदाजी करत धावा केल्या आणि आम्हाला विजयाची आशा दिली.'
'मैदानात आमच्याकडूनही चुका होतील. एक संघ म्हणून आम्ही त्याचे दडपण घेत नाही. आधीच्या चुका बाजूला सारून नव्याने कसे खेळायचे याकडे आमच्या संघाचे लक्ष असेल.'
'आमच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली होती पण नंतर फलंदाजांनी हुशारी दाखवली. इगो बाजूला ठेव अन् धावा काढण्यावर लक्ष दे असं प्रत्येकजण स्वत:ला समजावत होता,' असे मार्करम म्हणाला.