भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी२० मालिकेची सुरुवात विजयाने केली होती. पण दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. आज भारत-आफ्रिका तिसरा टी२० सामना रंगणार आहे.
भारताने पहिल्या दोन सामन्यात समान संघ उतरवला होता. पहिला सामना जिंकल्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी संघात कुठलाही बदल नव्हता. पण आज तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल होण्याची शक्यता आहे.
अक्षर पटेलला संघातून बाहेर काढले जाऊ शकते. पहिल्या दोन सामन्यात त्याला केवळ २ षटके टाकायला मिळाली आहेत आणि केवळ ३४ धावा काढल्या आहेत. त्याच्या जागी अष्टपैलू रमणदीप सिंह याला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
फिरकीपटू रवी बिश्नोईला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. त्याने पहिल्या सामन्यात ३ बळी घेतले असले तरी दुसऱ्या सामन्यात एकमेव विकेट घेतली आहे. आफ्रिकन पिचवर स्पिनर्सची धुलाई होत असल्याने त्याच्या जागी विजयकुमार वैशाकला ( Vijayakumar Vyshak ) पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते.
आवेश खानला निर्णायक सामन्यासाठी आज वगळले जाऊ शकते. आवेश खानने पहिल्या सामन्यात २ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या, पण दुसऱ्या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. त्याच्या जागी यश दयालला संघात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.