Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:17 IST

Open in App
1 / 8

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत पराभव केला आणि कसोटी मालिका २-०ने जिंकली.

2 / 8

पहिल्या कसोटीत खराब कामगिरी केल्यानंतर, भारतीय संघाकडून दुसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमनाची अपेक्षा होती. पण सर्व खेळाडूंनी निराशा केली आणि अपेक्षा फोल ठरल्या.

3 / 8

आफ्रिकेने दिलेले ५४९ धावांचे महाकाय लक्ष्य टीम इंडियाला झेपले नाही. भारताचा डाव १४० धावांत आटोपला आणि कसोटी इतिहासातील सर्वात मोठा पराभव झाला.

4 / 8

या लाजिरवाण्या पराभवानंतर प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी भारतीय संघाबाबत रोखठोक मत मांडले. त्यांनी भारतीय संघाला चांगलेच सुनावले.

5 / 8

'सध्याच्या कसोटी संघाला सुधारणेला खूप वाव आहे. काही खेळाडू कसोटीसाठी तयार नाहीत. पण प्रश्न असा आहे की किती जण खरोखर सज्ज आहेत?'

6 / 8

'पूर्वीचा टीम इंडियाचा भारतीय पिचवर दबदबा होता. भारतात भारतीय संघाला हरवणे शक्य होत नव्हते. पण आता तो दबदबा हळूहळू नाहीसा व्हायला लागलाय.'

7 / 8

'दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बवुमाला कर्णधार म्हणून निवडणे हे खूपच प्रेरणादायी आहे. तो त्याच्या नेतृत्वकौशल्याने आफ्रिकन संघाला नवनव्या उंचीवर नेण्यात सफल झालाय.'

8 / 8

'भारत आणि आफ्रिका यांच्यातील क्रिकेट संबंध कायम मैत्रिपूर्ण राहिलेत. त्यामुळे दोन्ही बाजूने बोलण्यात आलेले आक्षेपार्ह शब्द पुन्हा ऐकायला मिळू नयेत', अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकागौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ