टीम इंडियाने वनडे मालिका जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी२० मालिकेची सुरुवातही विजयाने केली. पहिल्याच सामन्यात भारताने १०१ धावांनी विजय मिळवला.
हार्दिक पांड्याच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर भारताने १७५ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांपुढे दक्षिण आफ्रिकेचा डाव ७४ धावांत आटोपला.
पहिल्या टी२० सामन्यात गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव जोडीने संजू सॅमसनला संघाबाहेर ठेवले आणि जितेश शर्माला संधी दिली. यामागे खास कारण असल्याचे सांगितले जात आहे.
२०२४ मध्ये संजू सॅमसनने ४३.६ च्या सरासरीने आणि १८०.१६ च्या स्ट्राईक रेटने तीन शतके ठोकत ४३६ धावा केल्या होत्या. पण त्यात यावर्षी सातत्य दिसले नाही.
यावर्षी त्याने १४ सामन्यांमध्ये फक्त १८५ धावा केल्या. त्याची सरासरी १८.५ आणि स्ट्राईक रेट १२०.९१ असल्याचे दिसले. या घसरणीमुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
माजी क्रिकेटर दीप दासगुप्ता म्हणाला की, जर संजू सॅमसन पहिल्या तीनमध्ये खेळत नसेल आणि भारताला किपरची गरज असेल तर जितेश संजूपेक्षा जास्त चांगला पर्याय आहे.
'संजूऐवजी जितेशला संधी हा योग्य निर्णय आहे. मधल्या फळीत फलंदाजी हवी असेल तर सलामीवीराला खाली फलंदाजीला पाठवण्यापेक्षा हा पर्याय सर्वोत्तम आहे,' असे दासगुप्ता म्हणाला.