अखेरच्या ६ चेंडूंत विजयासाठी ३० धावांची गरज असताना संजूला २० धावाच करता आल्या आणि ९ धावांनी दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण, या सामन्यात भारताकडून चूकांवर चूका झाल्या आणि त्या महागात पडल्या. संजू ६३ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८६ धावांवर नाबाद राहिला. भारता ला ८ बाद २४० धावा करता आल्या.
शुबमन गिल ( ३) व शिधर धवन ( ४) हे दोन्ही सलामीवीर अवघ्या ८ धावांवर माघारी परतले आणि तिथे भारताला मोठा धक्का बसला. तरीही पदार्पणवीर ऋतुराज गायकवाड ( १९) व इशान किशन ( २०) यांनी ६९ चेंडूंत ४० धावांची भागीदारी केली, परंतु त्यांना धावांचा वेग वाढवण्यात अपयश आले.
श्रेयस व संजू यांची ५४ चेंडूंवर ६७ धावांची भागीदारी करताना धावांचा वेग वाढवण्याचा छान प्रयत्न केला. श्रेयस ३७ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ५० धावांवर बाद झाला. संजूने आता सूत्र हाती घेतली खरी परंतू त्याला श्रेयससारखा धावांचा वेग राखता आला नाही.
शार्दूल ठाकूरसह त्याने ६६ चेंडूंत ९३ धावांची भागीदारी केली. लुंगी एनगिडीने सलग दोन धक्के देत भारताला बॅकफूटवर फेकले. त्यात कागिसो रबाडाचे ३९वे षटक निर्णायक ठरले. आवेश खानने त्या षटकात ५ चेंडूवर केवळ २ धावा केल्या आणि भारताच्या हातून सामना गेला.
रबाडाच्या त्या षटकात संजूला १ किंवा २ चेंडू जरी खेळण्याची संधी मिळाली असली तर सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने नक्की लागला असता. संजूने अखेच्या षटकात ६, ४, ४, ०, ४, १ अशा २० धावा केल्या आणि ९ धावांनी भारत हरला. ३९व्या षटकातील्या त्या ५ चेंडूंनी सामना फिरला.
तत्पूर्वी, मोहम्मद सिराव व रवी बिश्नोई यांच्याकडून आफ्रिकेच्या सेट फलंदाज डेव्हिड मिलर व हेनरिच क्लासेन यांचे सुटलेले झेलही महागात पडले. क्विंटनने ५४ चेंडूत ५ चौकारांसह ४८ धावा केल्या. क्लासेनने ६५ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७४ धावा केल्या, तर मिलर ६३ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ७५ धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकेने ४ बाद २५० धावा केल्या. या दोघांनी १०६ चेंडूंत १३९ धावांची भागीदारी केली.