WTC चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेच्या संघाने घरच्या मैदानावर व्हाईट वॉश देताना भारतीय संघाला ४०८ धावांनी पराभूत केले. हा भारतीय संघाचा आतापर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात मोठा पराभव ठरला. एवढेच नाही तर घरच्या मैदानात तिसऱ्यांदा टीम इंडियावर क्लीन स्वीपची नामुष्की ओढावली.
२००४ मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन संघाने नागपूर कसोटी सामन्यात ३४२ धावांनी पराभूत केल्याचा रेकॉर्ड आहे. हा भारतीय संघाचा कसोटीतील दुसरा मोठा पराभव आहे.
२००६ मध्ये भारतीय संघावर पाकिस्तान दौऱ्यात मोठ्या पराभवाची नामुष्की ओढावली होती. कराची कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या संघाने टीम इंडियाला ३४१ धावांनी पराभूत केले होते. यावेळी संघाचे नेतृत्व राहुल द्रविड याचेकडेच होते.
२००७ मध्ये मेलबर्न कसोटी सामन्यात अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला ऑस्ट्रेलिन संघाने ३३७ धावांनी मात दिली होती.
२०१७ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन संघाने पुण्याच्या घरच्या मैदानात ३३३ धावांनी पराभूत केले होते. हा भारतीय संघाचा कसोटीतील धावांच्या दृष्टीने पाचवा सर्वात मोठा पराभव आहे.
टेम्बा बावुमा आधी हान्सी क्रोन्येच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने १९९६ मध्ये कोलकाता कसोटी सामन्यात भारतीय संघाला ३२९ धावांनी मात दिली होती. त्यावेळी सचिन तेंडुलकर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होता. २००० मध्ये त्याच्यात नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतीय मैदानात पहिली वहिली कसोटी मालिका जिंकली होती.