IND vs AUS: एका दगडात 'पाच' पक्षी! ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत टीम इंडियाने केले 'हे' Top 5 विक्रम

Top 5 Records in Ind vs Aus ODI: भारताने ऑस्ट्रेलियाच्या संघाला आधी धू धू धुतलं अन् नंतर फलंदाजांना झटपट माघारी पाठवलं. या धमाकेदार विजयासह भारतीय संघाने आणि खेळाडूंनी ५ मोठे विक्रम आपल्या नावे केले.

Top 5 Records, IND vs AUS 2nd ODI: ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारताने धडाकेबाज विजय मिळवला. पावसाच्या प्रभावामुळे अडथळा आलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ९९ धावांनी धूळ चारली. जाणून घेऊया आजच्या सामन्यातील Top ५ विक्रम.

भारताने इंदूरच्या होळकर स्टेडियमवर आपला अजिंक्य राहण्याचा विक्रम अबाधित ठेवला. आतापर्यंत भारताने या स्टेडियमवर ७ वन डे खेळल्या असून त्यात भारताचा विजयाचा दर १०० टक्के कायम आहे.

शुबमन गिलने ९७ चेंडूत १०४ धावा केल्या. त्यामुळे ३५ वन डे डावांत त्याच्या १,९१७ धावा झाल्या. पहिल्या ३५ वन डे डावांत सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम गिलने आपल्या नावे केला. त्याने आफ्रिकेच्या हाशिम अमलाचा (१,८४४ धावा) विक्रम मोडला.

भारताने ऑस्ट्रेलिया विरूद्ध आज ५ बाद ३९९ धावांपर्यंत मजल मारली. आजवरच्या इतिहासात ही भारताची ऑस्ट्रेलिया विरूद्धची सर्वोत्तम धावसंख्या ठरली.

भारतीय संघाने वन डे क्रिकेटच्या इतिहासात कुणालाही न जमलेला विक्रम केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३००० षटकार मारणारा भारत पहिला संघ ठरला. आज भारताने १८ षटकार लगावले.

सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाची धुलाई करत नाबाद ७२ धावांची खेळी केली. या डावात त्याने ६ चौकार आणि ६ षटकार खेचले. याच खेळीच्या जोरावर सूर्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा भारतीय ठरला.