Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियानं धावांसह केली 'या' विक्रमांची 'बरसात'; T20 World Cup स्पर्धेत असं पहिल्यांदाच घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 01:14 IST

Open in App
1 / 10

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात रंगलेल्या 'करो वा मरो' लढतीत भारतीय संघाने झिम्बाब्वेला ७६ धावांनी पराभूत करत स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे.

2 / 10

पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाकडून सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मासह ईशान किशन याने संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली.

3 / 10

आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या धमाकेदार शोच्या जोरावर टीम इंडियाने पॉवर प्लेमध्ये ८० धावा कुटल्या. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात भारतीय संघाची पॉवर प्लेमधील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली.

4 / 10

झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात भारताकडून सहा जणांनी फलंदाजी केली. प्रत्येकाने २० हून अधिक धावा करताना १५५ पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं धावा काढल्या.

5 / 10

टी २० वर्ल्ड कपच्या इतिहासात एका संघाकडून सहा फलंदाजांनी १५० + स्ट्राइकसह २० प्लस धावा करण्याची कामगिरी याआधी कुणालाही जमलेली नाही. हा खास विश्वविक्रम टीम इंडियाच्या नावे झाला.

6 / 10

झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने १७ षटकार मारले. एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा नवा विक्रम टीम इंडियाने आपल्या नावे केला. याआधी गत हंगामता ग्रोस आइलेटच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने १५ षटकार मारल्याचा रेकॉर्ड होता.

7 / 10

झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने १७ षटकार मारले. एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा नवा विक्रम टीम इंडियाने आपल्या नावे केला. याआधी गत हंगामता ग्रोस आइलेटच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने १५ षटकार मारल्याचा रेकॉर्ड होता.

8 / 10

यंदाच्या हंगामात टीम इंडियाने आतापर्यंत ६३ षटकार मारले आहेत. एका हंगामात टीम इंडियाची ही सर्वोच्च कामगिरी आहे. गत हंगामात भारतीय संघाने ६१ षटकार मारले होते.

9 / 10

झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने फक्त २६ निर्धाव चेंडू खेळले. टीम इंडियाने २० षटकात सर्वात कमी निर्धाव चेंडू खेळण्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली. २०१६ मध्ये वानखेडेच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेनं फक्त २६ चेंडू निर्धाव खेळल्याचा रेकॉर्ड आहे.

10 / 10

भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध २५६ धावा करत टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या केली. श्रीलंकेचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची संधी अवघ्या ५ धावांनी हुकली. याआधी १९ वर्षांपूर्वी २००७ च्या हंगामात भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत २१८ धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडीत निघला आहे.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत-झिम्बाब्वेभारतीय क्रिकेट संघसंजू सॅमसनअभिषेक शर्माइशान किशनसूर्यकुमार यादवतिलक वर्माहार्दिक पांड्या