विराट कोहली इन्स्टाग्राम पोस्टमधून किती कमाई करतो? त्याच्यापेक्षा जास्त कोण खेळाडू कमावतो?

Virat Kohli Instagram Income: विराट कोहलीचे इन्टाग्राम अकाउंट सकाळी अचानक दिसेनासे झाले, मग काही वेळाने रिस्टोअर झाले.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली याच्या नावाची नेहमीच चर्चा असते. चाहते कायम त्याच्या अपडेट्स मिळवायचा प्रयत्न करत असतात. पण याचदरम्यान, शुक्रवारी सकाळी एक विचित्र घटना घडली.

तब्बल २७४ मिलियन फॉलोअर्स असलेले इन्स्टाग्राम अकाउंट अचानक दिसेनासे झाले. चाहते चिंतेत पडले. हे अचानक कसे घडले? विराट कुठे आहे? असे प्रश्न चाहत्यांनी इंटरनेटवरून थेट 'अनुष्का वहिनीं'ना विचारला.

काही तासांच्या गोंधळानंतर विराटचे अकाउंट इन्स्टाग्रामवर पुन्हा दिसू लागले. विराटने अकाउंट बंद केले नव्हते हे पक्के आहे. कारण इन्स्टा अकाउंट डिलीट करणं विराटलाही परवडणारे नव्हते. त्यातून तो बक्कळ कमाई करतो.

२०२६च्या ताज्या आकडेवारीनुसार, विराट कोहली त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका पोस्टमागे सुमारे ११-१४ कोटी रुपये कमावतो. प्रत्येक प्रकारच्या पोस्टसाठी आणि अँड कॅम्पेनसाठी विराट वेगवेगळे मानधन आकारतो.

इन्स्टाग्रामवरून कमाईच्या बाबतीत पोर्तुगालचा फुटबॉलर ख्रिस्टीआनो रोनाल्डो सर्वात पुढे आहे. तो प्रत्येक इन्स्टा पोस्टसाठी २६ कोटी रुपये घेतो. तर अर्जेंटिनाचा फुटबॉलर लिओनेल मेस्सी प्रत्येक पोस्टसाठी २१ कोटी घेतो.