Fact Check : Yuzvendra Chahal आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोटासाठी अर्ज दाखल?; त्या ट्विटने क्रिकेटपटूच्या आयुष्यात खळबळ

Is Cricketer Yuzvendra Chahal and Actor Dhanashree Verma files for divorce? भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यातील संबंध तुटल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.

Is Cricketer Yuzvendra Chahal and Actor Dhanashree Verma files for divorce? भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यातील संबंध तुटल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. चहलने त्याच्या इंस्टा स्टोरीवर न्यू लाईफ लोडिंग असा मॅसेज पोस्ट केला होता, त्याचवेळी धनश्रीने तिच्या इंस्टा अकाऊंटवरील 'Chahal' हे आडनाव काढून टाकल्याने चाहत्यांचा गोंधळ उडाला.

२२ डिसेंबर २०२०मध्ये चहल व धनश्री लग्न बंधनात अडकले आणि त्यानंतर धनश्री प्रत्येक क्रिकेट सामन्यात चहलला चिअर करण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित दिसली. मात्र, आता या दोघांमध्ये वाद सुरू असल्याची चर्चा सुरू आहे आणि अशात एका ट्विटने क्रिकेट विश्वात खळबळ माजवली आहे.

धनश्री एक डॉक्टर, कोरियोग्राफर आणि यूट्यूबर आहे. धनश्री अनेक वेळा सोशल मीडियावर आपले डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर लाइक्स आणि कॉमेंट्स येत असतात. एवढेच नाही तर तिची स्वतःची डान्स कंपनीदेखील आहे.

इंस्टाग्रामवरही धनश्रीचे पाच लाखांवर फॉलोअर्स आहेत. धनश्री तिचे ग्लॅमरस फोटो नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते. धनश्रीने लग्नात खूप छान लहेंगा घातला होता. या लहेंगात तू खूपच छान दिसत होती. धनश्री वर्माचा जन्म २७ डिसेंबर १९९६ ला मुंबईत झाला.

धनश्रीनंतर युजी चहलच्या एका इंस्टाग्राम पोस्टनेही अनेक चाहत्यांसमोर प्रश्न उपस्थित केले आहेत. चहलने एक इन्स्टा स्टोरी पोस्ट केली. त्यात असे लिहिले होते की एक नवीन जीवन सुरू होत आहे. याचा अर्थ धनश्री गरोदर आहे असाही अर्थ काढता येऊ शकतो. पण तसं असण्याची शक्यता फार कमी असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे.

त्यात ANI या वृत्तसंस्थेचा लोगो असलेल्या ट्विटरवरून चहल व धनश्री यांनी पंजाब कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले अन् एकच खळबळ उडाली...

पण, हे ट्विट फेक असल्याचे समोर आले आहे. ANIच्या अधिकृत ट्विटर हँडरवरून याबाबत स्पष्टिकरण देण्यात आले आहे.