कार्तिकच्या पहिल्या पत्नीशी लग्न, तरीही Murali Vijay ला 'दुसरी'सोबत जायचंय डिनरला; तिनं ठेवली अट!

भारताचा कसोटी संघातील सलामीवीर मुरली विजय ( Murali Vijay Retirement) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

भारताचा कसोटी संघातील सलामीवीर मुरली विजय ( Murali Vijay Retirement) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरीपेक्षा मुरली विजयची चर्चा ही दिनेश कार्तिकच्या पहिल्या पत्नीसोबतच्या अफेअर्समुळे अधिक रंगली.

मुरली विजयने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १५ वर्षांच्या या कारकिर्दीत मुरली विजयने ६१ कसोटी, १७ वन डे आणि ९ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे ३९८२, ३३९ आणि १६९ धावा केल्या आहेत. मुरली विजयने तिन्ही फॉरमॅटमध्ये १२ शतके आणि १६ अर्धशतके झळकावली आहेत.

मुरली विजयने २००९ मध्ये पहिला आयपीएल सामना खेळला. तो CSK मधील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. मुरली विजय गेल्या २ हंगामात आयपीएलमध्येही दिसला नव्हता. त्याने आयपीएल कारकिर्दीत १०६ सामने खेळले आणि एकूण २६१९ धावा केल्या. मुरलीने आयपीएलमध्ये २ शतके आणि १३ अर्धशतके झळकावली आहेत.

मुरली विजयने त्याचा मित्र व भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक याच्या पहिल्या पत्नीसोबत लग्न केलं. त्यामुळे विजय व कार्तिकची मैत्री तुटली. मुरली विजय आणि निकिता यांचा सुखाचा संसार सुरू आहे.

दरम्यान, मुरली विजयच्या निवृत्तीनंतर २०२०चा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. यात मुरली विजयने लॉक डाऊन संपल्यावर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू एलिसे पेरी ( Ellyse Perry) हिच्यासोबत डिनरला जाण्याची इच्छा व्यक्त केली.

लॉकडाऊनच्या काळातील ही मुलाखत आहे आणि तेव्हा त्याने पेरीसोबत डिनरला जायला आवडेल, ती खूप सुंदर आहे, असे म्हटले होते. ज्यावर तिनेही विजय बिल भरणार असेल तर नक्की जाईन, अशी अट ठेवली.