बिग बॉसमधील माजी स्पर्धकाच्या बहिणीला डेट करतोय दीपक चहर, लवरकच करणार लग्न

Deepak Chahar News: मनोरंजन आणि क्रिकेटमधील कनेक्शन हे आता नवे राहिलेले नाही. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंसोबत विवाह केला आहे. यामध्ये आता अजून एका नावाची भर पडली आहे. हे नाव आहे ते दीपक चहर याचे. दीपक चहर हा बिग बॉस ५ मधील स्पर्धत सिद्धार्थ भारद्वाजची बहीण जया हिला डेट करत असल्याची चर्चा आहे.

मनोरंजन आणि क्रिकेटमधील कनेक्शन हे आता नवे राहिलेले नाही. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंसोबत विवाह केला आहे. यामध्ये आता अजून एका नावाची भर पडली आहे. हे नाव आहे ते दीपक चहर याचे. दीपक चहर हा बिग बॉस ५ मधील स्पर्धत सिद्धार्थ भारद्वाजची बहीण जया हिला डेट करत असल्याची चर्चा आहे.

आपल्या अचून वेगवान गोलंदाजीच्या जोरावर दीपक चहरने अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली ओळख बनवली आहे. चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळणाऱ्या दीपक चहरने आयपीएलमध्येही अनेक सामन्यात जबरदस्त खेळ केला आहे.

आता समोर येत असलेल्या वृत्तानुसार दीपक चहर हा जया भारद्वाजला डेट करत आहे. दोघेही या नात्याबद्दल बऱ्यापैकी सीरियस आहेत. तसेच लवकरच ते त्यांच्यामधील नात्याचे विवाहामध्ये रूपांतर करणार असल्याचे वृत्त आहे.

दीपक चहर आणि जया यांच्यात लवकरच रोका होण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वी या दोघांचा साखरपुडा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जया ही आयपीएल सामने पाहण्यासाठी दुबईमध्ये जाण्याची शक्यता आहे.

जया ही सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे. सिद्धार्थ भारद्वाज व्हीजे, मॉडेल आणि एमटीव्ही Splitsvilla 2 चा विजेता राहिला आहे. त्याने साक्षी प्रधानसह हा शो जिंकला होता.

सिद्धार्थ भारद्वाज टीव्ही रियालिटी शो बिग बॉसमध्येही सहभागी झाला होता. २०११ मध्ये झालेल्या शोमध्ये सिद्धार्थ सेकंड रनर अप राहिला होता. तसेच त्याने फियर फॅक्टर खतरोंके खिलाडी-६ मध्येही सहभाग घेतला होता.

तर दीपक चहरची धाकटी बहीण मालती चहर ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. जानेवारी २०२० मध्ये दीपक चहरने बांगलादेशविरुद्ध केलेल्या जबरदस्त कामगिरीसाठी टी-२० परफॉर्मन्स ऑफ द इयरचा पुरस्कार पटकावला होता.

समोर येत असलेल्या वृत्तानुसार दीपकने जयाची ओळख संपूर्ण टीमला करून दिली आहे. जया ही दिल्लीतील रहिवासी असून, ती एका कॉर्पोरेट फर्ममध्ये काम करते. त्यामुळे आता दीपक आणि जया हे लवकरच विवाह करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.