धनश्री प्रत्येक भांडणानंतर 'डायमंड' मागायची...; युजवेंद्र चहलने आधीच दिलेली घटस्फोटाची 'हिंट'?

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा दोघेही घटस्फोटाच्या मुद्द्यावर पूर्णपणे मौन बाळगून आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 14:57 IST2025-02-27T14:56:22+5:302025-02-27T14:57:29+5:30

whatsapp join usJoin us
Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce old video diamond demand after every fight | धनश्री प्रत्येक भांडणानंतर 'डायमंड' मागायची...; युजवेंद्र चहलने आधीच दिलेली घटस्फोटाची 'हिंट'?

धनश्री प्रत्येक भांडणानंतर 'डायमंड' मागायची...; युजवेंद्र चहलने आधीच दिलेली घटस्फोटाची 'हिंट'?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल लग्नाच्या चार वर्षानंतर घटस्फोट घेत आहे. कोरोना काळात त्याने डान्सर, कोरियोग्राफर, मॉडेल धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हिच्याशी लग्न केले होते. ओळख होताच दोघांनी झटपट लग्नाचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात त्यांचे संबंध खूपच चांगले होते, पण गेल्या वर्षभरात या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं. त्यानंतर असं सांगण्यात येतं की, २० फेब्रुवारी २०२५ ला दोघांनी अधिकृतरित्या वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जातोय की, चहलला धनश्रीला पोटगी म्हणून ६० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. याबाबत दोघांकडूनही काहीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण या दोघांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल ( Diamond old video viral ) होतोय, जो सध्या चर्चेत आला आहे.

धनश्री ही प्रसिद्ध डान्सर आणि कोरियोग्राफर आहे. ती झलक दिखला जा या सुपरहिट शो मध्ये आली होती. त्यावेळी तिला सरप्राईज देण्यासाठी एका एपिसोडमध्ये युजवेंद्र चहलदेखील आला होता. या दोघांना एक खेळ खेळायला सांगितला होता. या खेळात एक शब्द लिहिला होता, जो वेगवेगळ्या हिंट देऊन समोरच्याने ओळखायचा होता. धनश्रीने कार्ड हातात धरलं आणि त्यावर डायमंड म्हणजेच हिरा असा शब्द होता. चहलला पहिली हिंट देताना धनश्रीला म्हणाला की, ही गोष्ट तू नेहमी माझ्याकडे मागत असतेस. धनश्रीला कळत नाही. मग युजी म्हणतो की, प्रत्येकवेळी भांडण झाल्यानंतर तुला ती गोष्ट हवी असते. तरही धनश्रीला कळत नाही. अखेर वेळ संपतो आणि बाकी लोक तिला तो शब्द 'डायमंड' होता असं सांगतात. त्यावर धनश्री म्हणते की, मी कधीच डायमंड मागितला नाही. तूच इअररिंग घातल्यात. त्यावर चहल तिच्या कानातील इअररिंगकडे बोट दाखवत खूण करतो. हा प्रकार अतिशय मजा-मस्करीच्या मूडमध्ये घडला होता. पण सोशल मीडियावर लोक धनश्रीवर टीकेचे बाण सोडताना दिसत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात या दोघांनी अधिकृतरित्या अर्ज दाखल केल्याचेही सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांच्या घटस्फोटाचे कारण नात्यातील सामंजस्याचा अभाव ( lack of compatability ) असे सांगण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यात दोघांनी आपल्या घटस्फोटाच्या चर्चांबद्दल पूर्णपणे मौन बाळगलं आहे. पण सोशल मीडियावर मात्र दोघे वेळोवेळी व्यक्त होताना दिसतात. सध्या तरी सोशल मीडियावर लोक या प्रकरणात धनश्रीवर जास्त टीका करताना दिसत आहेत. 

Web Title: Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce old video diamond demand after every fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.