ICC T20I Rankings : आशिया कप स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय टी-२० संघात जागा मिळालेल्या खेळाडूंपेक्षा संघाबाहेर राहिलेल्या खेळाडूंची अधिक चर्चा रंगताना दिसतेय. आता त्यात आणखी एका गोष्टीची भर पडलीये. ज्या खेळाडूला आशिया कप स्पर्धेसाठी निवडलेल्या १५ सदस्यीय संघात स्थान मिळालेले नाही त्या खेळाडूनं आयसीसी टी-२० क्रमवारीत उंच मारलीये. इथं जाणून घेऊयात कोण आहे तो खेळाडू? अन् त्यानं कितव्या स्थानावर घेतलीये झेप त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत पहिल्या तिघांनी आपलं स्थान ठेवलंय कायम
आयसीसी टी-२० क्रमवारीतील फलंदाजांच्या गटात भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा ८२९ रेटिंग पॉइंट्स सह अव्वलस्थानावर कायम आहे. त्याच्या पाठोपाठ या यादीत तिलक वर्माचा नंबर लागतो. त्याच्या खात्यात ८०४ रेटिंग पॉइंट्स जमा आहेत. या दोघांनाही आशिया कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात स्थान मिळाले आहे. इंग्लंडचा फिल सॉल्ट ७९१ रेटिंग पॉइंट्ससह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
Matthew Breetzke : आफ्रिकेच्या पठ्ठ्याची कमाल! २९० धावांसह वनडेत सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
यशस्वी जैस्वालची टॉप १० मध्ये एन्ट्री
आयसीसीच्या टी२० तील फलंदाजांच्या क्रमवारीत अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (७३९ रेटिंगसह सहाव्या स्थानावर) या तिघां शिवाय यशस्वी जैस्वाल हा एकमेव भारतीय बॅटर आहे जो टॉप १० मध्ये पोहचलाय. एका स्थानांनी सुधारणा करत यशस्वी ६७३ रेटिंगसह दहाव्या स्थानावर आहे. आशिया कप स्पर्धेसाठी तो राखीव पाच खेळाडूंपैकी एक आहे. याचा अर्थ त्याची अवस्था ही रेल्वेच्या डब्यात एखाद्याला RAC सीट मिळते तसं आहे. दुबईचं तिकीट कन्फर्म झालंय त्याचं तिकीट काही कारणास्तव कॅन्सल झालं तर त्याला कन्फर्म सीट मिळू शकते. अन्यथा त्याला टीम इंडियासोबत युएईलाही जाता येणार नाही.