WTC 2025 Final Prize Money Details : टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर गत चॅम्पियन कांगारुंची शिकार करत चांदीची गदा उचलत दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटी क्रिकेटमधील नवा चॅम्पियन ठरला. 'चोकर्स'चा टॅग पुसून काढत २७ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आयसीसी ट्रॉफी जिंकलीये. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांच्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील तिसऱ्या हंगामात तिसरा विजेता मिळाला. चांदीच्या गदेसह बक्षीस स्वरुपात विजेत्या दक्षिण आफ्रिकेसह उपविजेत्या ऑस्ट्रेलिया अन् टीम इंडियालाही आयसीसीकडून कोट्यवधीचं बक्षी मिळालं आहे. एक नजर टाकुयात चॅम्पियनस ट्रॉफी स्पर्धेच्या तिसऱ्या सत्रात कुणाला किती बक्षीस मिळालं यासंदर्भातील सविस्तर माहिती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दक्षिण आफ्रिका संघ मालामाल; टेस्ट चॅम्पियन संघाला मिळालं IPL चॅम्पियन RCB कित्येक पटीनं अधिक बक्षीस
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामातील जेतेपद पटकवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघ मालामाल (WTC 2025 Prize Money) झाला आहे. आयपीएल चॅम्पियन्स RCB पेक्षाही मोठी रक्कम टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील टेस्ट चॅम्पियन संघाला मिळाली आहे. ऑस्ट्रेलियन संघाला शह दिल्यावर चांदीची गदेसह दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ३.६ मिलियन डॉलर (जवळपास ३० कोटी रुपये) एवढी रक्कम बक्षीस स्वरुपात मिळालीये. इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला २० कोटी रुपये बक्षी मिळाले होते.
उप-विजेत्या ऑस्ट्रेलियासह टीम इंडियालाही मिळालं कोट्यवधीचं बक्षीस
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखातील गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया संघाला यंदाच्या हंगामात सलग दुसऱ्यांदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकण्याची संधी होती. पण दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर त्यांना चॅम्पियनचा रुबाब टिकवता आला नाही. उपविजेते पदावर समाधान मानावे लागलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला १८.५ कोटी रुपये एवढी रक्कम बक्षीसाच्या स्वरुपातमिळाली आहे. २०२३-२५ च्या वर्ल़् टेस्ट चॅम्पियनशिप चक्रात तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या टीम इंडियाला १२.३२ कोटी रुपये एवढे बक्षीस मिळाले आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत कोणत्या संघाला किती मिळालं बक्षीस? (WTC Final 2025 Prize Money)
- विजेता संघ (दक्षिण आफ्रिका)-जवळपास ३० कोटी रुपये
- उप विजेत्या संघ (ऑस्ट्रेलिया)- जवळपास १८ कोटी रुपये
- तिसऱ्या क्रमांकावरील संघ (भारत) - जवळपास १२ कोटी रुपये
- चौथ्या क्रमांकावरील संघ (न्यूझीलंड)- जवळपास १० कोटी रुपये
- पाचव्या क्रमांकावरील संघ (इंग्लंड)- जवळपास ८ कोटी रुपये
- सहाव्या क्रमांकावरील संघ (श्रीलंका)- जवळपास ७ कोटी रुपये
- सातव्या क्रमांकावरील संघ (बांगलादेश)- जवळपास ६ कोटी रुपये
- आठव्या क्रमांकावरील संघ (वेस्ट इंडिज): जवळपास ५ कोटी रुपये
- नवव्या क्रमांकावरील संघ (पाकिस्तान) : जवळपास ४ कोटी रुपये