WPL Auction 2023 Live : स्मृती मानधना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार; मुंबई इंडियन्सच्या प्रयत्नांना अपयश

Women’s Premier League 2023 auction Live : पहिल्या वहिल्या महिला प्रीमिअर लीग २०२३ साठी आज मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 02:53 PM2023-02-13T14:53:49+5:302023-02-13T14:54:54+5:30

whatsapp join usJoin us
WPL Auction 2023 Live : Smriti Mandhana sold to Royal Challenger Banglore at 3.40cr., Mumbai indians failed | WPL Auction 2023 Live : स्मृती मानधना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार; मुंबई इंडियन्सच्या प्रयत्नांना अपयश

WPL Auction 2023 Live : स्मृती मानधना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार; मुंबई इंडियन्सच्या प्रयत्नांना अपयश

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Women’s Premier League 2023 auction Live : पहिल्या वहिल्या महिला प्रीमिअर लीग २०२३ साठी आज मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.  मलिका सागर अडवाणी ( Malika Sagar Advani) ही ऑक्शनर म्हणून भुमिका पार पाडणार आहे. महिला प्रीमिअर लीगमध्येमुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स अशी संघांची नावं ठरवली गेली आहेत.

- WPL च्या लिलावात केवळ ९० खेळाडूंची निवड केली जाणार आहे. 
- प्रत्येक संघाला १८ खेळाडूंचीच निवड करता येणार आहे, १५० खेळाडूंचा एक संच असणार आहे.
-५०, ४० व २० लाख अशा तीन बेस प्राईज ( मुळ किंमत) ठेवण्यात आल्या आहेत. अनकॅप्ड खेळाडूसाठी १० ते २० लाखांची बेस प्राईज ठेवली जाईल. 
-लिलावासाठी एकूण १५२५ खेळाडूंनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी ४०९ खेळाडूंची निवड केली गेली. 
- यामध्ये २४६ भारतीय आणि १६३ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे, ज्यात संलग्न संघटनेचे ८ खेळाडूही आहेत.

पहिल्या सेटमध्ये सोफी डिव्हाईन ( न्यूझीलंड-, सोफी एक्लेस्टन ( इंग्लंड), अॅशली गार्डनर ( ऑस्ट्रेलिया), हरमनप्रीत कौर व स्मृती मानधना ( भारत), हॅली मॅथ्यू ( वेस्ट इंडिज), एलिसे पेरी ( ऑस्ट्रेलिया) यांच्यावर बोली लागणार आहे.  इंडियन प्रीमिअर लीगच्या २००८च्या पहिल्या लिलावात ९.५ कोटींसह महेंद्रसिंग धोनी सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. महिला प्रीमिअर लीगमध्ये हा मान कोण पटकावतोय याची उत्सुकता आहे. स्मृती मानधनाचे पहिले नाव येताच मुंबई इंडियन्सच्या निता अंबानी यांनी पॅडल उचलला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी बोली लावण्यास सुरुवात  केली. २.६० कोटी पर्यंत दोन्ही फ्रँचायझींमध्ये चुरस रंगली. स्मृतीने ११२ ट्वेंटी-२० सामन्यांत ११२च्या स्ट्राईक रेटने २६५१ धावा केल्या आहेत. RCB ने ३.४० कोटींत तिला आपल्या ताफ्यात घेतले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: WPL Auction 2023 Live : Smriti Mandhana sold to Royal Challenger Banglore at 3.40cr., Mumbai indians failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.