WPL 2026 Retained Players List Full Squads Of All Five Teams : महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2026) आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्ससह पाच फ्रँचायझी संघांनी आपल्या ताफ्यात कायम ठेवलेल्या खेळाडूंची ( Retained Players) यादी समोर आली आहे. आश्चर्य म्हणजे आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक २२ विकेट्स घेत प्लेयर ऑफ द सीरिज ठरलेल्या दीप्ती शर्मासह दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातीन विश्वविक्रमी कामगिरी करणाऱ्या लॉरा लॉरा वोल्वार्ट या खेळाडूंचा रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये समावेश आहे. कदाचित ही गोष्ट या दोन्ही खेळाडूंसाठी लिलावात चांगली रक्कम देणारी ठरणार का ते पाहण्याजोगे असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबई इंडियन्ससह दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं प्रत्येकी ५-५ खेळाडूंना केलं रिटेन
WPL च्या आगामी हंगामासाठी संघ बांधणीची पहिली महत्त्वपूर्ण पायरी असलेल्या रिटेन रिलीजच्या खेळात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या महिला संघाने प्रत्येकी ५-५ खेळाडूंना कायम ठेवले आहे. रॉयल चॅलंजर्स बंगळुरुच्या संघाने ३ खेळाडूंना कायम ठेवले असून गुजरातच्या संघाने २ तर युपी वॉरियर्सच्या संघाने एकमेव खेळाडू रिटेन केला आहे. इथं नजर टाकुयात कोणत्या संघाने कुणाला किती रुपयांसह रिटेन केलं आहे त्यासंदर्भातील सविस्त माहिती
भारतीय महिला संघाकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना स्पेशल गिफ्ट; मेडलसंदर्भातील 'तो' संभ्रमही दूर
मुंबई इंडियन्सच्या संघानं हरमप्रीतला पगार वाढ दिली, पण इंग्लंडच्या ब्रंटची कमाई तिच्यापेक्षा अधिक
भारतीय महिला संघाला वर्ल्ड चॅम्पियन करणाऱ्या हरमनप्रीतला मुंबई इंडियन्सच्या संघाने २.५ कोटी रुपयांसह रिटेन केलं आहे. आधीच्या रक्कमेपेक्षा तिचा प्राइज टॅग ७० हजारांनी वाढला आहे. पण पगार वाढ होऊनही ती संघातील महागडी खेळाडू नाही. कारण गत हंगामात तिच्यापेक्षा महागडी ठरलेली इंग्लंडची ऑल राउंडर नॅट सायव्ह ब्रंटलाही MI नं संघात कायम केलं आहे. एवढेच नाही तिला ३० हजार वाढीव रक्कम दिली आहे. त्यामुळे ती ३ कोटी २० लाख रुपयांवरून ३.५ कोटीवर पोहचली आहे. हरमनप्रीत कौरच्या तुलनेत तिचा पगार एक कोटी अधिक आहे.
मुंबई इंडियन्स महिला संघ
- हरमनप्रीत कौर (२.५ कोटी रुपये)
- अमनजोत कौर (१ कोटी रुपये),
- हीली मॅथ्यूज (१.७५ कोटी रुपये)
- नॅट सायव्हर ब्रंट (३.५ कोटी)
- जी. कमलिनी (५० लाख रुपये)
दिल्ली कॅपिटल्स
- ॲनाबेल सदरलँड (२.२ कोटी रुपये)
- मारिझॅन कॅप (२.२ कोटी रुपये)
- शफाली वर्मा (२.२ कोटी रुपये)
- जेमिमा रोड्रिग्स (२.२ कोटी रुपये)
- निकी प्रसाद (५० लाख रुपये)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
- स्मृती मानधना (३.५ कोटी रुपये)
- रिचा घोष (२.७५ कोटी रुपये),
- एलिस पेरी (२ कोटी रुपये), श्रेयंका पाटील (६० लाख)
गुजरात जाएट्स
- ॲशली गार्डनर (३.५ कोटी)
- बेथ मूनी (२.५ कोटी रुपये)
यूपी वॉरियर्स