WPL 2026 Opening Ceremony : महिला प्रीमियर लीग (WPL 2026) च्या चौथ्या हंगामाची सुरुवात गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि २०२४ च्या हंगामातील विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील लढतीने होणार आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर विरुद्ध उप कर्णधार स्मृती मानधना असा सामना शुक्रवारी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी बॉलिवूड कलाकार उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात आपला जलवा बिखरताना दिसतील. इथं नजर टाकुयात कोणते कलाकार यंदाच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये रंग भरणार आहेत? हा कार्यक्रम कसा पाहता येईल यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
WPL 2026 च्या ओपनिंग सेरेमनीच्या खास कार्यक्रमात हे बॉलिवूडकर भरणार रंग
WPL 2026 च्या उद्घाटन सोहळ्यात लोकप्रिय गायक यो यो हनी सिंग आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांचा दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळेल. याशिवाय २०२१ ची मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री हरनाझ कौर संधूची झलकही पाहायला मिळेल.
टीम इंडियातील ब्युटीनं स्वत:ला २-३ महिने एका खोलीत बंद करुन ठेवलं होतं; बुमराहचा खास उल्लेख करत म्हणाली...
असे आहे उद्घाटन समारंभातील कार्यक्रमाचे नियोजन
मुंबई इंडियन्स महिला संघ विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील WPL मधील पहिली लढत नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याआधी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम सुरु होईल. यो यो हनी सिंग हिप-हॉप आणि पॉप बीट्ससह लाईव्ह परफॉर्मन्स सादर करेल. जॅकलिन फर्नांडिस ही या कार्यक्रमात नृत्य सादरीकरण करणार असून मिस युनिव्हर्स हरनाझ संधू प्रेरणादायी भाषण या कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहे.
चाहत्यांना कुठं पाहता येईल हा कार्यक्रम?
WPL च्या सामन्याचे थेट प्रेक्षपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओ हॉटस्टारवर उपलब्ध असेल. हा कार्यक्रमही याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पाहता येईल.
स्पर्धेतील पाच सहभागा संघांचे पहिल्या टप्प्यातील सामने नवी मुंबईच्या मैदानात रंगणार
WPL च्या यंदाच्या हंगामातील मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स या पाच सहभागी संघाचे पहिल्या टप्प्यातील सामने हे नवी मुंबईत खेळवण्यात येतील. त्यानंतर स्पर्धा वडोदरा येथे स्थलांतरित होईल, जिथे नॉकआउट सामनेही खेळवले जाणार आहेत.