युपीने दिलेले २२६ धावांचे विशालकाय लक्ष्य पेलण्यात थोडक्यात अपयशी ठरलेल्या गतविजेत्या बंगळुरुने महिला प्रीमियर लीगमध्ये सलग पाचवा पराभव स्वीकारला. यासह स्मृती मानधनाच्या संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. प्रथम फलंदाजी करताना युपीने २० षटकांत ५ बाद २२५ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात कडवी झुंज देणाऱ्या बंगळुरुचा डाव १९.३ षटकांत २१३ धावांवर संपुष्टात आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"हम तो डूबेंगे सनम, तुम्हे भी ले डूबेंगे ..
अखेरच्या षटकांमध्ये ६ चेंडूंत २६ धावा करणाऱ्या स्नेह राणाने बंगळुरुच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या, पण अखेर त्यांना १२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दीप्तीच्या संघ स्पर्धेतून आधीच बाहेर पडला होता. पण त्यांनी "हम तो डूबेंगे सनम, तुम्हे भी ले डूबेंगे ..." हे गाणं वाजवंत, स्मृतीच्या संघालाही स्पर्धेतून बाद केले आहे. RCB च्या पराभवासह मुंबई इंडियन्स आणि गुजरातचा संघ प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरला आहे.
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय फसला
नाणेफेक गमावून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय बंगळुरुच्या अंगलट आला. सामनावीर जॉर्जिया वॉल (नाबाद ९९) आणि ग्रेस हॅरिस (३९) यांनी युपीला झंझावाती सुरुवात करून दिली. या दोघींनी पहिल्या सात षटकांमध्ये ७७ धावांची सलामी दिली. ग्रेस हॅरिस बाद झाल्यानंतर जॉर्जियाने किरण नवगिरेला सोबत घेत फटकेबाजी सुरूच ठेवली. किरणने १६ चेंडूंत ४६ धावांचे योगदान दिले. जॉर्जिया वॉल मात्र अखेरपर्यंत नाबाद राहूनही शतक झळकावण्यात केवळ एका धावेने कमी पडली.
संक्षिप्त धावफलक
युपी: २० षटकांत ५ बाद २२५ धावा (जॉर्जिया वॉल नाबाद २९, किरण नवगिरे ४६, ग्रेस हॅरिस ३९) गोलंदाजी : जॉर्जिया वरहॅम २/४३, चार्ली डीन १/४७. बंगळुरु : १९.३ षटकांत सर्वबाद २१३ धावा (रिचा घोष ६९, एस. मेघना २७, स्नेह राणा २७) गोलंदाजी : सोफी एक्लेस्टोन ३/२५, दीप्ती शर्मा ३/५०, सिनेल हेन्री २/३९, अंजली सरवानी १/४०.
बंगळुरुकडून जॉर्जिया वरहॅम (२) आणि चार्ली डीन (१) वगळता एकाही गोलंदाजाला यश मिळविता आले नाही. प्रत्युत्तरात, बंगळुरुची आघाडीची फळी पुन्हा अपयशी ठरली. रिचा घोषने ३३ चेंडूंत ६९ धावा करत एकतर्फी झुंज दिली होती. पण ती बाद होताच बंगळुरुचा पराभव दृष्टिपथात आला. युपीकडून सोफी एक्लेस्टोन आणि दीप्ती शर्मा यांनी सर्वाधिक तीन-तीन बळी घेतले.