महिला प्रीमिअर लीग (Womens Premier League 2025) स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामातील नवव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru Women) विरुद्ध यूपी वॉरियर्ज (UP Warriorz Women) यांच्यात सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. सामना बरोबरीत सुटल्यावर सुपर ओव्हरमध्ये यूपीच्या संघानं बाजी मारली. स्मृती मानधनाच्या गत चॅम्पियन आरसीबी संघावर सलग दुसऱ्या पराभवाची नामुष्की ओढावली. एवढ सगळ होऊनही स्मृतीच्या आरसीबीचा रुबाब कायम आहे. कारण WPL गुणतालिकेत सलग दुसऱ्या पराभवानंतरही आरसीबीचा संघ टॉपला आहे. जाणून घेऊयात या स्पर्धेत कोणता संघ कोणत्या स्थानावर आहे त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दीप्तीचा यूपी फायद्यात! आरसीबीसंदर्भात ना नफा ना तोटा सीन
आरसीबी महिला संघाविरुद्धच्या सुपर विजयानंतर दीप्ती शर्मा यूपी वॉरियर्सला गुणतालिकेत फायदा झाला आहे. पण आरसीबी ना नफा ना तोटा या सीनसह आपलं अव्वलस्थान टिकवून आहे. यामागचं कारण आहे त्यांनी उत्तम धावगतीसह केलेला खेळ. सुपर ओव्हरमधील थरारक विजयानंतर यूपी वॉरियर्सच्या संघानं गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतलीये.
मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानावर
महिला प्रीमिअर लीगच्या तिसऱ्या हंगामातील ९ सामन्यानंतर स्मृती मानधनाच्या आरसीबी संघानं ४ पैकी २ सामन्यातील विजयासह ०.६१९ अशा उत्तम नेट रनरेटसह अव्वलस्थान कायम राखले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ ३ सामन्यातील २ विजयासह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचे नेट रनरेट ०.६१० असं आहे. यूपी वॉरियर्ज सलग दोन विजयासह ०.१६७ नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे.
गुजरात जाएंट्स तळाला
गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जाएंट्स हे दोन संघ तळाला आहेत. दिल्ली कॅपिटल्सनं ४ पैकी २ सामने जिंकले आाहेत. पण त्यांचे नेट रनरेट -०.८२६ आहे. आता उर्वरित सामन्यात जोर लावून स्पर्धेतील स्थान टिकवण्याचे आव्हान या संघासमोर असेल. गुजरात जाएंट्सच्या संघानं ३ सामन्यात फक्त एकच विजय मिळवला असून हा संघ सर्वात तळाला आहे.
Web Title: WPL 2025 Points Table Smriti Mandhana Lead RCB At Number 1 Position Even After 2 Consecutive Defeats Mumbai Indians And UP Warriorz Climb 2nd And 3rd In List
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.