भारतीय संघाची सातत्यपूर्ण धमाकेदार कामगिरी आणि आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील यश पाहून क्रिकेट जगतातील महान क्रिकेटपटू विव रिचर्ड्स (Viv Richards) प्रभावित झाले आहेत. रिचर्ड्स यांच्या मते. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये (वनडे आणि टी २०) भारतीय संघ सर्वोच्च स्तरावर आहे. एकेकाळी वेस्ट इंडिजचा जसा दबदबा होता तशीच कामगिरी आता भारतीय संघ करत आहे, असे मोठे वक्तव्य त्यांनी केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय क्रिकेट सध्याच्या घडीला सर्वोच्च स्तरावर
दिग्गज विव रिचर्ड्स यांनी पीटीआयशी बोलताना भारतीय संघाच्या कामगिरीवर भाष्य केले. ते म्हणाले की, भारताने विशेषतः मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील खेळाला एका वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. ज्या देशात क्रिकेटला इतकं प्रेम मिळतं, तिथे भारतीय संघ विश्वविजेता होणं हा योग्य आहे. यावेळी रिचर्ड्स यांनी भारताच्या सध्याच्या वर्चस्वाची तुलना १९७० च्या दशकातील वेस्ट इंडिज संघाशी केली आहे. १९७५ आणि १९७९ मध्ये सलग दोन वर्ल्ड कप जिंकून वेस्ट इंडिजच्या संघाने क्रिकेट जगतात आपला दबदबा दाखवून दिला होता. भारतीय संघ सध्याच्या घडीला त्याचपद्धतीने आपल्यातील धमक दाखवत आहे, असे ते म्हणाले आहेत.
अक्षर पटेल चांगलाच संतापला, कॅप्टन सूर्यकुमार यादवनं मागितली माफी; 'त्या' सामन्याआधी काय घडलं?
चॅम्पियन्स ट्रॉफीपासून वर्ल्ड कपपर्यंतचा 'गोल्डन रन'
भारताचं हे यश केवळ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपुरते मर्यादित नाही. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल गमावल्यावर भारतीय संघाने दमदार कमबॅक केले. २०२४ मध्ये भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. त्यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अपराजित राहून व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला. या स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडच्या संघाला मात देतच ICC ची ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर घरच्या मैदानात रंगलेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने आपला रुबाब कायम ठेवला.
मोठा धक्का बसल्यावर घेतलेला निर्णय ठरला टर्निंग पाइंट
टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत साखळी फेरीत अपराजित राहून टीम इंडियाने अपेक्षेप्रमाणे अगदी दाबात सुपर ८ फेरीत प्रवेश केला. पण दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ७६ धावांनी पराभवाचा धक्का दिल्यावर टीम इंडियासाठी सेमीच समीकरणच बदलले. प्रत्येक सामना महत्त्वाचा अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर भारतीय संघाने संजू सॅमसनवर पुन्हा डाव लावला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर खेळलेला हा डाव यशस्वी ठरला. संजू सॅमसन याने सलग तीन अर्धशतकासह टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन करण्यात मोलाची भूमिका बजावली.