Virat Kohli vs Sourav Ganguly: "कोहलीविरोधात खेळी करून सौरव गांगुलीने अख्खं भारतीय क्रिकेट हादरवून टाकलं"; माजी क्रिकेटरचा थेट आरोप

वन डे कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर विराटने आपली बाजू मांडली. त्यानंतर लगबगीने गांगुलीनेही प्रसारमाध्यमांसमोर येत BCCIची बाजू मांडली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 12:08 PM2022-01-18T12:08:53+5:302022-01-18T12:10:23+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli vs Sourav Ganguly Pakistani Cricketer Rashid Latif says it unsettled whole Indian cricket | Virat Kohli vs Sourav Ganguly: "कोहलीविरोधात खेळी करून सौरव गांगुलीने अख्खं भारतीय क्रिकेट हादरवून टाकलं"; माजी क्रिकेटरचा थेट आरोप

Virat Kohli vs Sourav Ganguly: "कोहलीविरोधात खेळी करून सौरव गांगुलीने अख्खं भारतीय क्रिकेट हादरवून टाकलं"; माजी क्रिकेटरचा थेट आरोप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli vs Sourav Ganguly, Indian Team Captaincy: गेल्या काही महिन्यात जो घटनाक्रम भारतीय क्रिकेटमध्ये दिसून आला, त्यावरून भारताचे दोन माजी कर्णधार म्हणजेच विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यात वाद असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. काही फॅन्सने याबद्दल सोशल मीडियावरही मतं व्यक्त केली आहेत. भारतीय क्रिकेटमधील काही मुद्द्यांवरून विराट आणि गांगुली यांच्यात मतभेद असल्याचं बोललं जात आहे. तशातच कोहलीने तडकाफडकी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने चर्चांना अधिकच उधाण आहे आहे. त्यात आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रशीद लतिफ याने गांगुलीवर काही आरोप केले आहे.

"विराटच्या आयुष्यात असा टप्पा येण्यामागचं खरं कारण म्हणजे त्याचे क्रिकेट बोर्डाशी असलेले मतभेद. विराटने जरी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय वैयक्तिक असल्याचं सांगितलं असलं किंवा सौरव गांगुली ट्वीट करून विराटच्या वैयक्तिक निर्णयाचं स्वागत करत असला तरी माझं असं स्पष्ट मत आहे की हे खरं पाहता दोन बड्या खेळाडूंमधील भांडणंच आहे", असं रोखठोक मत रशीद लतिफने व्यक्त केलं.

"काही खेळाडू हे भावनाप्रधान असतात. त्यांना माहिती आहे की विराट कोहलीसारख्या आक्रमक व्यक्तिला कसं आणि कधी भडकवायचं. जेव्हा त्याने टी२० कर्णधारपद सोडलं तेव्हा थोड्या दिवसातच त्याला वन डे कर्णधारपदावरूनही दूर करण्यात आले. पण त्यांना हे समजत नाहीये की अशी खेळी खेळून तुम्ही केवळ विराट कोहलीच नव्हे तर संपूर्ण भारतीय क्रिकेटलाच धक्का पोहोचवला आहे", अशी प्रतिक्रियाही त्याने एका कार्यक्रमात बोलताना दिली.

दरम्यान, विराटला वन डे कर्णधारपदावरून अचानक हकलण्यात आल्यानंतर कोहलीने आपली बाजू पत्रकारांसमोर मांडली होती. त्यावेळी लगबगीने सौरव गांगुली BCCI च्या वतीने बाजू मांडण्यासाठी हजर झाला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी जेव्हा संघ जाहीर केला, तेव्हादेखील त्यांनी विराटच्या विरोधात सूर आळवला होता. त्यामुळे विराट आणि बीसीसीआय यांच्यात सारं काही आलबेल नाही अशी चर्चा होतीच. पण रशीद लतिफच्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

Web Title: Virat Kohli vs Sourav Ganguly Pakistani Cricketer Rashid Latif says it unsettled whole Indian cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.