IND vs NAM, Usman Tariq of Namibia Cricket Fans Link Gerhard Erasmus Bowling Action to Pakistan Spinner : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील भारत विरुद्ध नामिबिया यांच्यातील सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात नामिबियाचा कर्णधार गेर्हार्ड एरॅस्मस याने कमालीची गोलंदाजी करत चार विकेट्स घेतल्या. या गोलंदाजाची तुलना पाकिस्तानच्या उस्मान तारीक याच्यासोबत करण्यात येत आहे. इथं जाणून भारतीय संघाला अजब गजब गोलंदाजी शैलीसह आपल्या जाळ्यात अडकवणाऱ्या नामिबियाच्या कॅप्टनसंदर्भात रंगणाऱ्या चर्चेसंदर्भातील खास गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नामिबियाच्या कॅप्टनने केली वादग्रस्त गोलंदाजी शैलीमुळे चर्चेत असलेल्या पाकिस्तानी गोलंदाजाची कॉपी?
नामिबियाचा कर्णधार गेर्हार्ड एरॅस्मस आपल्या फिरकीतील जादू दाखवून देताना कधी २४ यार्ड म्हणजे क्रिजच्या खूप मागून गोलंदाजी करतानाही दिसून आले. एवढेच नाही तर त्याने काही चेंडू हे अगदी यंदाच्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत वादग्रस्त गोलंदाजी शैलीमुळे चर्चेत असलेल्या पाकिस्तानी मिस्ट्री स्पिनरच्या अंदाजात टाकले. त्यामुळेच सोशल मीडियावर त्याची तुलना पाकिस्तानी गोलंदाजाशी होऊ लागली आहे. क्रिकेट चाहत्यांनी त्याला 'नामिबियाचा उस्मान तारिक' असा टॅग लावला आहे.
T20 World Cup 2026 : टीम इंडियाचा जलद 'सेंच्युरी'चा पराक्रम! नामिबिया विरुद्ध 'द्विशतक' झालं, पण...
अंपायरनं त्याच्या एका चेंडूवर आक्षेप घेतला, डेड बॉल घोषित केला, पण पुढे....
नामिबियाच्या कर्णधाराने भारताच्या ईशान किशन आणि तिलक वर्मा यांच्या दमदार खेळीला ब्रेक लावला. एवढेच नाही तर १९ व्या षटकात त्याने हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलच्या रुपात दोन विकेट्स घेतल्या. याच षटकात त्याने शिवम दुबेलाही धावबाद केले. आपल्या ४ षटकातील कोट्यात सुरुवातीच्या षटकात अचानक गोलंदाजी शैली बदलून खूप मागून टाकलेला एक चेंडू पंचांनी डेड बॉल घोषित केला. यावर तो पंचाशी वाद घालतानाही पाहायला मिळाले. त्याच धाटणीतील चेंडूवर मग त्याने तिलक वर्माला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. तगडी बॅटिंग ऑर्डर असलेल्या भारतीय संघासमोर ४ षटकात २० धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या.
Web Summary : Namibia's captain Gerhard Erasmus's unique bowling action in the match against India sparks comparisons to Pakistan's Usman Tariq. His variations and use of the crease, including bowling from far behind, led to him taking 4 wickets, drawing both criticism and praise.
Web Summary : भारत के खिलाफ मैच में नामीबिया के कप्तान गेरहार्ड इरास्मस की अनूठी गेंदबाजी शैली ने पाकिस्तान के उस्मान तारिक से तुलना को जन्म दिया। उनके विविधताओं और क्रीज के उपयोग, जिसमें पीछे से गेंदबाजी करना शामिल है, के कारण उन्होंने 4 विकेट लिए, जिससे आलोचना और प्रशंसा दोनों मिली।