Asia Cup 2025 United Arab Emirates Won By 42 Runs Against Oman : आशिया चषक स्पर्धेतील सातव्या सामन्यात यजमान संयुक्त अरब अमिरात (UAE) संघाने ओमानच्या संघाला पराभूत करत यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केलीये. अलीशान शराफू ५१ (३८) आणि कर्णधार मुहम्मद वसीम ६९ (५४) यांच्या खेळीच्या जोरावर अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना UAE च्या संघाने निर्धारित २० षटकात ५ बाद १७२ धावा केल्या होत्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या धावांचा पाठलाग करताना ओमानचा संघ १३० धावांत आटोपला. या विजयासह यजमान UAE संघाने आशिया कप स्पर्धेतील आपल्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. एवढेच नाही तर मोठा डाव साधत IND vs PAK यांच्यातील लढतीमुळे निर्माण होणाऱ्या वादग्रस्त मुद्दा निकाली काढण्याच्या दिशेनं त्यांनी एक पाऊल टाकले आहे. ते कसं जाणून घेऊयात सविस्तर
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार!
आशिया चषक स्पर्धेतील 'अ' गटात भारत-पाक या दोन संघासोबत UAE अन् ओमानच्या संघाचा समावेश आहे. या गटातून साखळी फेरीतील दोन संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करतील. ओमानच्या संघाने पहिल्या दोन लढती गमावल्यामुळे ते सुपर फोरच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. दुसरीकडे यजमान UAE संघानं पाकला बाहेर काढण्यासाठी शड्डू ठोकलाय. भारतीय संघाने पहिल्या दोन लढती जिंकत सुपर फोरचं तिकीट पक्क केलंय. आता या गटातून दुसरा संघ कोणता ते पाकिस्तान आणि UAE यांच्यातील लढतीवर ठरणार आहे. जर UAE च्या संघाने पाकला दणका दिला तर साखळी फेरीतच त्यांचा खेळ खल्लास होईल. त्यामुळे सुपर फोरसह फायनलमध्ये पुन्हा पुन्हा IND vs PAK चित्र दिसेल, हे समीकरणच बदलून जाईल.
IND vs PAK : ...अन् तो ठरला बुमराहला षटकार मारणारा पहिला पाकिस्तानी; इथं पाहा रेकॉर्ड
खरंच हे शक्य होईल का? UAE च्या संघात मोठा उलटफेर करण्याची क्षमता आहे का?
UAE च्या संघाला भारतीय संघाविरुद्ध मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. टीम इंडियासमोर निभाव लागला नसला तरी ओमानविरुद्ध त्यांच्या सलामीवीरांनी धमक दाखवलीये. UAE चा संघ आतापर्यंत पाकिस्तानसोबत एकदाही विजय नोंदवू शकलेला नाही. पण या संघाविरुद्ध ते खेळले आहेत. जर कर्णधार मुहम्मद वसीमसह सलामीवीर अलीशान शराफू याने कामगिरीत सातत्य राखले तर हा डाव साधणं सहज शक्य आहे.
या तारखेला होणार सुपर फोरमध्ये कोण जाणार त्याचा फैसला
बुधवारी १७ सप्टेंबरला दुबई आंतरारष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर यूएई विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना रंगणार आहे. या सामन्यात जो जिंकेल तो सुपर फोरमध्ये एन्ट्री मारेल. इथं पाकिस्तानच्या संघानं बाजी मारली तर सुपर फोरमध्ये पुन्हा भारत-पाक यांच्यातील लढत पाहायला मिळू शकते. एवढेच नाहीतर फायनलमध्येही दोन संघसमोरासमोर येऊ शकतात. पण पाकिस्तानचा संघ पाहता ते सुपर फोरमध्ये पोहचले तरी इथं ते टिकतील असे वाटत नाही.
Web Title: United Arab Emirates Won By 42 Runs Against Oman And Still Alive In Asia Cup 2025 Know He Eyes On Beat Pakistan And Enter Super 4 With Team India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.