India A Squad For One Day South Africa A : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसह बीसीसीआयने वनडे मालिकेसाठी भारतीय 'अ' संघाची घोषणा केली आहे. तिलक वर्माच्या नृत्वाखाली भारतीय 'अ' संघ दक्षिण आफ्रिका 'अ' संघाविरुद्ध ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी मैदानात उतरेल. या वनडे मालिकत ऋतुराज गायकवाड याच्याकडे उप कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय अभिषेक शर्मासह अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णाही या मालिकेत धमक दाखवताना दिसतील.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ईशान किशन-रियान पराग या स्टार खेळाडूंसह या युवा खेळाडूंना मिळाली संधी तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात ईशान किशन आणि रियान परागसह आयुष बडोनी निशांत सिंधु, विपराज निगम, मानव सुथार आणि प्रभसिमरन सिंग या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारत 'अ' संघात कॅप्टन आणि अनकॅप्ड खेळाडूंचे संतुलन पाहायला मिळते. प्लेइंग इलेव्हनमध्ये विकेट किपर बॅटरच्या रुपात ईशान किशन आणि प्रभसिमरन सिंग यांच्यात तगडी फाईट असेल. दोघेही स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातात.
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत 'अ' संघ :
तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उप कप्तान), अभिषेक शर्मा, रियान पराग, ईशान किशन (विकेटकीपर), आयुष बडोनी, निशांत सिंधु, विपराज निगम, मानव सुथार, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर).
तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली संघ कधी खेळणार वनडे मालिका?
दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात उतरतील, अशी चर्चा रंगली होती. पण संघ निवडीनंतर हे दिग्गज थेट ३० नोव्हेंबरपासून रंगणाऱ्या वनडे मालिकेत खेळणार हे स्पष्ट झाले आहे. त्याआधी तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील संघ १३ नोव्हेंबर, १६ नोव्हेंबर आणि १९ नोव्हेंबर या कालावधीत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळेल. हे तिन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ९ वाजता सुरु होतील.
Web Summary : Tilak Varma leads India A against South Africa A in ODIs. Ruturaj Gaikwad is vice-captain. Kishan, Parag, Arshdeep Singh, and Krishna are included in the squad for the three-match series starting November 13th. Focus is on balancing youth and experience.
Web Summary : तिलक वर्मा दक्षिण अफ्रीका 'ए' के खिलाफ वनडे में भारत 'ए' का नेतृत्व करेंगे। ऋतुराज गायकवाड़ उप-कप्तान हैं। किशन, पराग, अर्शदीप सिंह और कृष्णा को 13 नवंबर से शुरू होने वाली तीन मैचों की श्रृंखला के लिए टीम में शामिल किया गया है। युवा और अनुभव को संतुलित करने पर ध्यान केंद्रित किया गया है।