Tilak Varma Reveals He Was Diagnosed With Rhabdomyolysis : भारतीय टी-२० संघाचा युवा स्टार बॅटर तिलक वर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतून पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या या क्रिकेटनं जीवघेण्याचा आजाराचा सामना केला आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने गंभीर आणि जीवघेण्याचा आजाराचा सामना केल्याचा खुलासा केला आहे. योग्य वेळी योग्य उपचार मिळाले म्हणून वाचलो, नाहीतर माझं काही खरं नव्हते, असेही त्याने म्हटले आहे. या युवा क्रिकेटरला कधी अन् नेमकं काय झालं होतं? कुणाच्या मदतीमुळे त्याचा जीव वाचला? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रबडोमायोलिसिस (Rhabdomyolysis) आजारानं बेजार झाला होता क्रिकेटर
गौरव कपूरच्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या खास शोमध्ये तिलक वर्मानं जीवघेण्या आजाराचा सामना केल्याचा खुलासा केला आहे. २०२२ च्या आयपीएल स्पर्धेतनंर तिलक वर्मा रबडोमायोलिसिस (Rhabdomyolysis) आजाराने बेजार झाला होता. यासंदर्भात तिलक वर्मा म्हणाला की, "बांगलादेश 'अ' विरुद्धच्या सामन्यात अचानक माझी तब्येत बिघडली. शंभर चेंडूचा सामना केल्यावर अचानक माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. माझ्या बोटांची हालचाल होणं बंद झालं. शरीर दगडासारखे कठीण झाले होते. त्यामुळे रिटायर्ड हर्ट होत मैदान सोडण्याची वेळ माझ्यावर आली. हाताची बोटांची अजिबात हालचाल होत नसल्यामुळे त्यावेळी ग्लोव्ह्ज कापून काढावे लागले. एवढेच नाही तर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यावर सलाईन लावताना सुई मोडली होती. " असेही त्याने गंभीर आजारावर भाष्य करताना सांगितले आहे.
ते स्लेजिंग करत होते; मॅच संपेपर्यंत मी शांत राहिलो, मग... तिलक वर्मानं शेअर केली मैदानातील गोष्ट
आकाश अंबानी अन् जय शाह मदतीला धावले अन् मोठा धोका टळला
तो पुढे म्हणाला, त्यावेळी मी मुंबई इंडियन्स संघाचा भाग होतो. मला आकाश अंबानी यांचा कॉल आला. त्यांनी बीसीसीआयशी संपर्क साधला. त्यांच्यासह जय शाह यांची मदत मिळाली. मला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जर उशीर झाला असता तर जीवाला धोका होता, असे डॉक्टर म्हणाले होते, असे सांगत त्याने तत्पर मदतीला धावणाऱ्या आकाश अंबानी आणि जय शाह यांचे या कार्यक्रमात आभारही मानले.
रबडोमायोलिसिस म्हणजे काय? तिलक वर्माला (Rhabdomyolysis)
रबडोमायोलिसिस (Rhabdomyolysis) ही एक जीवघेणी आजार आहे, ज्यात शरीरातील स्नायूंची ऊती (मसल्स) तुटू लागतात आणि त्यातील मायोग्लोबिन नावाचं प्रोटीन रक्तात मिसळतं. त्यामुळे मूत्रपिंडांवर (किडनीवर) गंभीर परिणाम होऊ शकतो. विश्रांती न घेता सातत्याने सराव आणि जीम सत्र यावर फोकस केल्यामुळे या गंभीर आजाराचा सामना करण्याची वेळ आली होती, असेही क्रिकेटरनं म्हटले आहे.