T20 World Cup Final, Man of the Tournament: डेव्हिड वॉर्नरचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाल्यावर शोएब अख्तर भडकला, आयसीसीवर आरोप केला

T20 World Cup Final, New Zealand vs Australia Live Updates : ऑस्ट्रेलियानं पहिले ट्वेंटी-२० आणि सहावे विश्वविजेतेपद नावावर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 12:21 AM2021-11-15T00:21:38+5:302021-11-15T00:24:19+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup Final : Was really looking forward to see babar azam becoming Man of the Tournament, Unfair decision for sure, Say Shoaib Akhtar | T20 World Cup Final, Man of the Tournament: डेव्हिड वॉर्नरचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाल्यावर शोएब अख्तर भडकला, आयसीसीवर आरोप केला

T20 World Cup Final, Man of the Tournament: डेव्हिड वॉर्नरचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाल्यावर शोएब अख्तर भडकला, आयसीसीवर आरोप केला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup Final, New Zealand vs Australia Live Updates : ऑस्ट्रेलियानं पहिले ट्वेंटी-२० आणि सहावे विश्वविजेतेपद नावावर केले. न्यूझीलंडचे १७३ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियानं १८.५ षटकांत २ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. किवींकडून कर्णधार केन विलियम्सन एकटा खेळला, तर ऑसींसाठी डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांची बॅट तळपली. वॉर्नरनं अर्धशतकी खेळी करून ऑस्ट्रेलियाचा पाया रचला आणि त्यावर मिचेल मार्शनं कळस चढवला. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार ( Man of the Tournament)  वॉर्नरनं नावावर केला. पण, या पुरस्कारावरून वाद सुरू झाला आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर यानं हा चुकीचा निर्णय असल्याचा दावा केला आहे. 

आयपीएल २०२१मध्ये खेळाडूंना पाणी घेऊन जाण्याचं काम करण्यास भाग पाडणाऱ्या डेव्हिड वॉर्नरनं ( David Warner) कमाल केली. वॉर्नरला आयपीएल २०२१च्या ८ सामन्यांत १९५ धावाच करता आल्या होत्या. सनरायझर्स हैदराबादनं तर त्याला अखेरच्या काही सामन्यांत प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर केले. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात त्याच्याकडून नेतृत्वपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आणि त्याला खेळाडूंसाठी पाणी घेऊन जाण्यास भाग पाडले.  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान वॉर्नरनं पटकावून टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. वॉर्नरनं या  स्पर्धेत २८९ धावा केल्या आणि त्याला आयसीसीनं स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार दिला. 

सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये वॉर्नर दुसऱ्या क्रमांकावर असूनही त्याला हा पुरस्कार दिल्यानं अख्तरनं नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ३०३ धावांसह अव्वल स्थानी आहे आणि त्याला हा पुरस्कार मिळायला हवा होता, असे मत अख्तरनं व्यक्त केले. 
 

सामन्याचा संक्षिप्त निकाल
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ( Kane Williamson) यानं  ४८ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८५ धावा केल्या. हेझलवूनंच त्याची विकेट घेतली. हेझलवूडनं ४ षटकांत १६ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  न्यूझीलंडनं २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच ( ५) अपयशी ठरला. डॅरील मिचेलनं अप्रतिम झेल टिपला.

१५ धावांवर पहिला धक्का बसल्यानंतर डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. वॉर्नर व मार्श यांनी पहिल्या १० षटकांत १ बाद ८२ धावा उभारून दिल्या. त्यांना ६० चेंडूंत विजयासाठी ९१ धावा करायच्या होत्या. वॉर्नर ३८ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावांवर माघारी परतला.  मार्श ५० चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावांवर नाबाद राहिला. मॅक्सवेलनं नाबाद २८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं १८.५ षटकांत ८ विकेट्स राखून विजय मिळवला.  

Web Title: T20 World Cup Final : Was really looking forward to see babar azam becoming Man of the Tournament, Unfair decision for sure, Say Shoaib Akhtar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.