आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. इंग्लंड दौऱ्यात नेतृत्वासह फलंदाजीतील कर्तृत्व सिद्ध करुन दाखवणारा शुबमन गिलची वर्षभरानंतर भारतीय टी-२० संघात एन्ट्री झाली. एवढेच नाही तर सूर्य कुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघात त्याच्याकडे उप कर्णधार पदाची जबाबदाहीही सोपवण्यात आलीये.
हे कसं झालं अन् कुणाच्या मर्जीनं हा प्लॅन शिजला?
कसोटी कर्णधार टी-२० तील उप-कर्णधार झाल्याची गोष्ट अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. हा निर्णय म्हणजे याआधी उप-कर्णधार होऊन मिरवणाऱ्या अक्षर पटेलवर अन्याय आहे का? त्याचे संघातील स्थान आता डळमळीत झालंय, असा याचा अर्थ काढायचा का? एवढेच काय तर सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीलाही यामुळे धोका निर्माण झालाय का? असे प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडू शकतात. पण खरंतर यात काहीच आश्चर्यकारक नाही. हे कसं झालं अन् कुणाच्या मर्जीनं हा प्लॅन शिजला? याबद्दल खुद्द सूर्यकुमार यादवनं सर्वकाही फोडून सांगितलं आहे.
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
शुबमन गिलला उप कर्णधार का केलं? सूर्यकुमार यादव म्हणाला की,...
२०२४ च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर श्रीलंका दौऱ्यावर शुबमन गिल भारतीय टी-२० संघाचा भाग होता. जुलै २०२४ च्या या दौऱ्यात मी कर्णधार होतो. त्याच वेळी त्याच्याकडे उप-कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पुढच्या टी-२० वर्ल्ड कपच्या तयारीची ही सुरुवात होती. वर्षभराच्या काळात टेस्ट आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमुळे तो टी-२० संघाचा भाग नव्हता. आता तो पुन्हा संघाला जॉईन झालाय याचा आनंद आहे, असे म्हणत सूर्यानं जे आधी ठरलंय त्याप्रमाणेच त्याने पुन्हा आपली जबाबदारी हाती घेतीलीये, असे म्हटले आहे.
गिलच्या अनुपस्थितीत अक्षर पटेलकडे देण्यात आली होती ही जबाबदारी
शुबमन गिल हा भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आहे. त्याने भारताकडून अखेरचा टी-२० सामना हा जुलै २०२४ मध्ये खेळला होता. त्याच्या अनुपस्थितीत अक्षर पटेलकडे उप कर्णधारपद सोपवण्यात आले होते. पण आता तो संघात परतल्यावर पुन्हा गिलकडेच ही जबाबदारी देण्यात आली आहे.