IPL 2026: सनरायझर्स हैदराबादकडे एकापेक्षा एक खतरनाक खेळाडू; लिस्ट पाहून प्रतिस्पर्ध्यांची उडेल झोप!

SRH Squad 2026: सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत केवळ एकदाच (२०१६) विजेतेपद पटकावले आहे. मात्र, यावेळी हैदराबादने त्यांच्या संघात अशा खेळाडूंचा समावेश केला आहे, जे एकहाती संघाला विजय मिळवून देऊ शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 17:01 IST2026-03-18T17:00:00+5:302026-03-18T17:01:45+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Sunrisers Hyderabad has one more dangerous player; rivals will lose sleep after seeing the list! | IPL 2026: सनरायझर्स हैदराबादकडे एकापेक्षा एक खतरनाक खेळाडू; लिस्ट पाहून प्रतिस्पर्ध्यांची उडेल झोप!

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादकडे एकापेक्षा एक खतरनाक खेळाडू; लिस्ट पाहून प्रतिस्पर्ध्यांची उडेल झोप!

सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत केवळ एकदाच (२०१६) विजेतेपद पटकावले आहे. मात्र, यावेळी हैदराबादने त्यांच्या संघात अशा खेळाडूंचा समावेश केला आहे, जे एकहाती संघाला विजय मिळवून देऊ शकतात. संघात सलामीवर अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड आणि ईशान किशनसह अनेक विस्फोटक खेळाडू आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांसमोर मोठे आव्हान आहे.

हैदराबादची सर्वात मोठी ताकद त्यांची सलामीची जोडी आहे. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड हे जगातील सर्वात विध्वंसक जोडी मानली जाते. या दोघांपैकी एक जरी मैदानावर टिकला, तरी धावांचा पाऊस पाडण्याची त्यांची क्षमता कोणत्याही गोलंदाजासाठी धडकी भरवणारी आहे. संघाच्या मधल्या फळीत ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, लियाम लिव्हिंगस्टोन, हेनरिक क्लासेन आणि अनिकेत वर्मा यांच्यामुळे अधिक मजबूत झाली. तर, गोलंदाजीमध्ये हर्षल पटेल, जयदेव उनाडकट आणि फिरकीपटू हर्ष दुबे यांच्यावर मदार असेल. कमिन्सच्या जागी परदेशी वेगवान गोलंदाज म्हणून इशान मलिंगा किंवा ब्रायडन कार्स यांना संधी मिळू शकते. तज्ज्ञांचे मत,  हा संघ कागदावर अत्यंत शक्तिशाली दिसत आहे. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून शिवम मावी आणि झीशान अन्सारी यांचा वापर केल्यास हैदराबादला रोखणे कठीण जाईल.

दरम्यान, संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स सध्या पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने तो आयपीएल २०२६ चे सुरुवातीचे काही सामने खेळण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत संघाची धुरा कोणाकडे असेल, यावर चर्चा सुरू आहे. कर्णधारपदाच्या शर्यतीत ईशान किशनचे नाव सर्वात आघाडीवर आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने झारखंडचे यशस्वी नेतृत्व केले असून सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ट्रॅव्हिस हेडकडेही नेतृत्वाचा अनुभव आहे, संघ त्याच्या नावाचाही गांभीर्याने विचार करू शकतो. युवा स्टार अभिषेक शर्माकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देऊन भविष्यातील नेता म्हणून त्याला तयार केले जाऊ शकते.

सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ:

पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, आर स्मरण, इशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामेंदू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कार्स, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा, झीशान अन्सारी, शिवांग कुमार, सलील अरोरा, साकिब हुसेन, ओंकार तारमाले, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, क्रेन्स फुलेत्रा, लियाम लिव्हिंगस्टोन, शिवम मावी, जॅक एडवर्ड्स.

Web Title : सनराइजर्स हैदराबाद की खतरनाक टीम: विरोधी खो सकते हैं नींद!

Web Summary : सनराइजर्स हैदराबाद के पास अभिषेक शर्मा और ट्रैविस हेड जैसे विस्फोटक बल्लेबाजों के साथ एक शक्तिशाली टीम है। मजबूत मध्यक्रम और विविध गेंदबाजी आक्रमण के साथ, वे आईपीएल गौरव का लक्ष्य रखते हैं। किशन नेतृत्व कर सकते हैं।

Web Title : Sunrisers Hyderabad's formidable squad: Rivals to lose sleep!

Web Summary : Sunrisers Hyderabad boasts a powerful squad with explosive batsmen like Abhishek Sharma and Travis Head. With a strong middle order and varied bowling attack, they aim for IPL glory. Kishan may lead.