Sri Lanka Womens Tri-Nation Series 2025 : जेमिमा रॉड्रिग्जची विक्रमी शतकी खेळी आणि सलामीवीर स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांनी झळकावलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने कोलंबो येथे रंगलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला २३ धावांनी पराभूत केले. या सामन्यातील विजयासह भारतीय महिला संघआने श्रीलंकेतील तिरंगी वनडे मालिकेत फायनल गाठलीये. भारत आणि श्रीलंका यांच्यात ११ मे रोजी या वनडे मालिकेतील फायनल खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येईल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जेमिमाच्या शतकासह दीप्ती अन् स्मृतीचं अर्धशतक
कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रतिका रावल १(५), हरलीन देओल ४ (५) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर २८ (२०) स्वस्तात माघारी फिरल्यावर सलामीवीर स्मृती मानधना हिे ६३ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. जेमिमा रॉड्रिग्जनं १०१ चेंडूत १५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १२३ धावांची खेळी केली. तिच्याशिवाय दीप्ती शर्मानं ८४ चेंडूत ९३ धावा केल्या. या तिघींच्या आश्वासक खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात ३३७ धावा केल्या होत्या.
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
दक्षिण आफ्रिकेकडून दोघींनी अर्धशतक झळकावले, पण...
धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून ॲनेरी डेर्कसेन ८१ (८०) आणि कर्णधार क्लोई ट्रायॉन ६७ (४३) या दोघींनी अर्धशतकी खेळी केली. पण भारताकडून अमनजोत कौर (३/५९) आणि ऑफस्पिनर दीप्ती शर्मा (२/५७) यांनी उत्तम गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला निर्धारित ५० षटकात ३१४/७ धावांवर रोखले.
दक्षिण आफ्रिकेचा सलग तिसरा पराभव
श्रीलंकेतील तिरंगी वनडे मालिकेत रॉबिन राउंड पद्धतीने खेळवण्यात आलेल्या ४ सामन्यात भारतीय संघाने ३ विजय नोंदवत फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सलग तिसऱ्या पराभवासह मालिकेतील प्रवास संपुष्टात आला. यजमान श्रीलंकेनं ३ सामन्यात २ विजयासह फायनल पक्की केली आहे.
Web Title: Sri Lanka Womens Tri-Nation Series 2025 Women’s ODI Tri-Series: India beats South Africa by 23 runs, set to meet Sri Lanka in final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.