चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलची चर्चा रंगत असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं अधिकृत एक्स अकाउंटवरून आगामी वनडे मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. श्रीलंकेच्या यजमानपदाखाली भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ या मालिकेत खेळताना दिसतील. २७ एप्रिलला यजमान श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील लढतीनं या तिरंगी मालिकेची सुरुवात होणार असून अंतिम सामना ११ मे २०२५ रोजी खेळवण्यात येणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कधी अन् कुठं रंगणार महिला वनडेचा थरार?
श्रीलंका, भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ श्रीलंकेच्या आप प्रेमदासा आंतरारष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या मालिकेत वनडे सामने खेळतील. प्रत्येक संघ या मालिकेत सहभागी संघासोबत प्रत्येकी २-२ सामन्यानुसार, एकूण चार लढती खेळेत. यात आघाडीवरील दोन संघ फायनलमध्ये एकमेकांसोबत भिडतील. हे सर्व सामने दिवसा खेळवण्यात येतील.
श्रीलंका-भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेचे वेळापत्रक
२७ एप्रिल - श्रीलंका विरुद्ध भारत
२९ एप्रिल - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
१ मे - श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका
४ मे - श्रीलंका विरुद्ध भारत
६ मे - दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
८ मे - श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका
११ मे - अंतिम सामना
WPL ची सांगता झाली की, थोडी विश्रांती अन् मग...
सध्याच्या घडीला भारतीय मैदानावर महिला प्रीमिअर लीग सुरु आहे. १४ मार्चला या स्पर्धेतील फायनल खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत देश विदेशातील महिला खेळाडूंचा समावेश आहे. टी-२० सामन्यांचा हा थरार संपला की, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय महिला संघ वनडे मालिकेसाठी सज्ज होईल. एका बाजूला आयपीएल आणि दुसऱ्या बाजूला महिला क्रिकेटमधील वनडे मालिका अशी मेजवानी क्रिकेट प्रेमींसाठी असेल.
Web Title: Sri Lanka To Host India And South Africa In A Tri Nation Series 3 Women's Team Will Be In Action In The 50 Over Tournament In Sri Lanka
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.