Sourav Ganguly New House : सौरव गांगुली ४८ वर्षांनंतर वडिलोपार्जित घर सोडणार; ४० कोटींच्या नवीन आलिशान घरात राहायला जाणार, Photo 

Sourav Ganguly New House : BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुलीच्या घराचा पत्ता बदलला आहे. गांगुलीने कोलकाता येथे नवीन आलिशान घर खरेदी केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 03:20 PM2022-05-20T15:20:39+5:302022-05-20T15:32:26+5:30

whatsapp join usJoin us
Sourav Ganguly New House : BCCI President Sourav Ganguly buys new house worth 40 CRORES, see pic | Sourav Ganguly New House : सौरव गांगुली ४८ वर्षांनंतर वडिलोपार्जित घर सोडणार; ४० कोटींच्या नवीन आलिशान घरात राहायला जाणार, Photo 

Sourav Ganguly New House : सौरव गांगुली ४८ वर्षांनंतर वडिलोपार्जित घर सोडणार; ४० कोटींच्या नवीन आलिशान घरात राहायला जाणार, Photo 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Sourav Ganguly New House : BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुलीच्या घराचा पत्ता बदलला आहे. गांगुलीने कोलकाता येथे नवीन आलिशान घर खरेदी केले आहे. भारताचा माजी कर्णधार गांगुलीने नवीन घरासाठी ४० कोटी रुपये खर्च केले आणि आता तो ४८ वर्षांनंतर वडिलोपार्जित घर सोडणार आहे. ''माझे स्वतःचे घर असल्याचा आनंद आहे. मध्यवर्ती राहणे देखील सोयीचे होईल. पण सर्वात कठीण गोष्ट म्हणजे मी ४८ वर्षे राहिलो ते ठिकाण सोडणे,''अशी प्रतिक्रिया गांगुलीने Teleghraph ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.


Teleghraphने दिलेल्या माहितीनुसार गांगुलीने लोव्हर रावडन स्ट्रीट येथे 23.6-cottah plot खरेदी केला आहे आणि त्यावर त्याचा आलिशान बंगला उभा राहिला आहे. गांगुलीचे नवीन घर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे त्याला   कामानिमित्ताने प्रवास करणे सोपे जाणार आहे. त्याचं जुनं घर हे बेहाला येथे आहे. उद्योगपती अनुपमा बाग्री, केशव दास बिनानी आणि निकुंज दास बिनानी यांच्याकडून गांगुलीने ही प्रॉपर्टी खरेदी केली आहे.  


त्याने सह मालक म्हणून आई निरुपा गांगुली, पत्नी डोना गांगुली आणि मुलगी सना गांगुली यांना  ठेवले आहे. लवकरच गांगुली आयसीसीच्या अध्यक्षपदी दिसणार आहे. सध्याचे चेअरमन ग्रेग बार्क्ली यांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत आहे आणि गांगुली या पदासाठी उभा राहण्याची शक्यता आहे.  

Web Title: Sourav Ganguly New House : BCCI President Sourav Ganguly buys new house worth 40 CRORES, see pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.