टीम इंडियातील प्रिन्स नंबर वनवर कायम! किंग कोहलीची टॉप ५ मध्ये एन्ट्री

पाक विरुद्धच्या दिमाखदार शतकाचा कोहलीला झाला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 16:46 IST2025-02-26T16:43:04+5:302025-02-26T16:46:31+5:30

whatsapp join usJoin us
Shubman Gill consolidates No 1 position Virat Kohli Re Enters Top Five Of ICC Men’s ODI Batting Rankings | टीम इंडियातील प्रिन्स नंबर वनवर कायम! किंग कोहलीची टॉप ५ मध्ये एन्ट्री

टीम इंडियातील प्रिन्स नंबर वनवर कायम! किंग कोहलीची टॉप ५ मध्ये एन्ट्री

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 Virat Kohli Re Enters Top Five  Of ICC Men’s ODI Batting Rankings :  आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सातत्याने दमदार कामगिरी करत टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिल याने एकदिवसीय क्रमवारीतील आपलं अव्वलस्थान अधिक भक्कम केले आहे. दुसरीकडे पाकिस्तान विरुद्ध नाबाद शतकी खेळीसर विराट कोहलीनं पुन्हा एकदा एकदिवय क्रमवारीत अव्वल पाचमध्ये एन्ट्री मारली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

शुबमन गिल ८०० पार; अव्वलस्थान केलं आणखी भक्कम 

दुबईच्या मैदानात रंगलेल्या 'अ' गटातील बांगलादेश विरुद्धच्या लढतीत शुबमन गिलनं शतकी खेळी केली होती. या सामन्यातील १०१ धावांच्या खेळीनंतर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने ४६ धावांची उपयुक्त खेळी केल्याचे पाहायला मिळाले. या दोन खेळीसह त्याच्या रेटिंग पॉइंट्समध्ये २१ गुणांची भर पडली असून तो आता ८१७ रेटिंग पॉइंट्सह वनडे क्रमवारीत नंबर वनवर कायम आहे. पाकिस्तानच्या ताफ्यातील बाबर आझम आणि शुबमन गिल यांच्यातील अंतर खूपच वाढले आहे. बाबर आझमला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एका अर्धशतकाशिवाय चांगली खेळी करता आली नाही. परिणामी तो  ७७० रेटिंग पॉइंटसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ७५७ रेटिंग पॉइंटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

किंग कोहलीची टॉप ५ मध्ये एन्ट्री

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात कोहलीला आपल्या भात्यातील धमक दाखवता आली नव्हती. पण पाकिस्तान विरुद्ध त्याने वनडे कारकिर्दीतील ५१ शतक झळकावले. या शतकाचा कोहलीला रँकिंगमध्ये फायदा झाला असून तो आता आयसीसीच्या फलंदाजांच्या एकदिवसीय क्रमवारीत पाचव्या स्थानावर पोहचलाय. दक्षिण आफ्रिकेचा हेन्री क्लासेन (७४९ रेटिंग पॉइंट्स) पाठोपाठ कोहलीचा नंबर लागतो. त्याच्या खात्यात ७४३ रेटिंग पॉइंट्स जमा झाले आहेत.  

श्रेयस अय्यरही टॉप १० मध्ये कायम

बांगलादेशच्या सामन्यात अवघ्या १५ धावांचे योगदान देणाऱ्या श्रेयस अय्यरनं पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत दमदार अर्धशतक झळकावले होते. या अर्धशतकाच्या जोरावर तोही टॉप १० मधील आपलं स्थान टिकवण्यात यशस्वी ठरलाय. ६७९ रेटिंग पॉइंट्ससह तो नवव्या स्थानावर आहे. 

Web Title: Shubman Gill consolidates No 1 position Virat Kohli Re Enters Top Five Of ICC Men’s ODI Batting Rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.