Join us

धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...

Australian female cricketers sexually assaulted: घटना ऐकून भारतीय आणि ऑस्ट्रेलियन अधिकारी हादरले, पोलिसांमध्येही खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 12:36 IST

Open in App

Australian female cricketers sexually assaulted: आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक सध्या भारतात सुरू आहे. या स्पर्धेत सहभागी असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील दोन महिला खेळाडूंसोबत इंदोरमध्ये एक घाणेरडी घटना घडली. दोन्ही खेळाडू महिला क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. हॉटेल रेडिसन ब्लू येथून कॅफेकडे जात असताना, दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि त्यांना अयोग्यरित्या स्पर्शही केला. या विचित्र घटनेने दोन्ही खेळाडू घाबरल्या आणि त्यांनी लगेच सुरक्षा अधिकाऱ्यांना माहिती दिली. ही घटना ऐकून भारतीय आणि ऑस्ट्रेलियन अधिकारीही हादरले. त्यानंतर सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांच्या तक्रारीवरून एमआयजी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.

खजराणा रोड येथील घडला प्रकार

गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास खजराना रोडवर ही घटना घडली. दोन्ही ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू एका कॅफेमध्ये (द नेबरहूड) जात होत्या. पांढरा शर्ट आणि काळी टोपी घातलेला एक दुचाकीस्वार त्यांच्या मागे लागला. तो वेगाने जवळ आला आणि एका महिला क्रिकेटपटूला अयोग्यरित्या स्पर्श केला. या घटनेने दोन्ही खेळाडू घाबरल्या आणि त्यांनी ताबडतोब ऑस्ट्रेलियन संघाचे सुरक्षा अधिकारी डॅनी सिमन्स यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. खेळाडू अस्वस्थ असल्याचे पाहून जवळच असलेल्या कारमधील एक माणूस मदतीसाठी पुढे आला आणि त्याने त्यांनी धीर दिला.

पोलिसांमध्ये खळबळ उडाली

त्या व्यक्तीने नंतर दोन्ही खेळाडूंच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि लगेच पोलिस अधिकाऱ्यांना फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. परदेशी खेळाडूंशी संबंधित या घटनेमुळे पोलिस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. सुरक्षा आणि प्रोटोकॉल अधिकारी डॅनी सिमन्स यांच्याकडून अर्ज प्राप्त झाला. पोलिसांनी शुक्रवारी एफआयआर नोंदवला.

English
हिंदी सारांश
Web Title : Shocking! Two Australian Women Cricketers Sexually Assaulted in India

Web Summary : Two Australian cricketers were sexually assaulted in Indore while heading to a cafe. A motorcyclist harassed and inappropriately touched one of them. Police have registered an FIR following the incident, causing concern among officials.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५लैंगिक शोषणलैंगिक छळभारतपोलिसआॅस्ट्रेलियामहिला