आशिया कप स्पर्धेआधी संजू सॅमसन एका मागून एक धमाकेदार खेळी करताना दिसतोय. लोकल टी-२० लीगमध्ये त्याच्या भात्यातून दमदार सेंच्युरीनंतर आता सलग दोन अर्धशतके आली आहेत. सातत्यपूर्ण खेळीसह त्याने आशिया कप स्पर्धेसाठी आपल्या ओपनिंग जागेवर रुमाल टाकला आहे. केरळा प्रीमियर लीगमधील त्याची कामगिरी भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवसह कोच गौतम गंभीर यांचे टेन्शन वाढवणारी आहे. जाणून घेऊयात त्यामागचं कारण
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आशिया कपसाठी तीन ओपनर; एक फिक्स दुसऱ्या जागेसाठी दोघांत टक्कर, त्यात...
आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाने १५ सदस्यीय संघाची निवड केली आहे. मुख्य संघात अभिषेक शर्मा, शुबमन गिल आणि संजू सॅमसन या तिघांना सलामीवीराच्या रुपात संघात स्थान देण्यात आले आहे. बॅकअप सलामीवीराच्या रुपात सर्वोत्तम बॅटर यशस्वी जैस्वाल राखीव खेळाडूंच्या यादीत आहे. यात अभिषेक शर्मा हा आयसीसी रँकिंगमध्ये नंबर वन बॅटर असल्यामुळे सलामीवीराच्या रुपात तो खेळणार हे फिक्स आहे. पण शुबमन गिलच्या एन्ट्रीमुळे संजू सॅमसन रिस्क झोनमध्ये गेला होता. शुबमन गिल उप कर्णधार असल्यामुळे तो संघात असणार हे पक्क आहे. त्यामुळे संजूला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली तरी तो डावाला सुरुवात करणार का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पण लोकल लीगमध्ये धमाक्यावर धमाका करत संजू सॅमसन याने आपली सलामीला खेळण्याची दावेदारी भक्कम केल्याचे दिसते.
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
गंभीरचा डाव फसणार? आता सूर्या दादा संजूवरच भरवसा दाखवणार?
कोच गौतम गंभीर यांच्यामुळेच वर्षभरापासून संघाबाहेर असलेल्या शुबमन गिलला टी-२० संघात जागा मिळाल्याचेही बोलले जाते. त्याला संघात घेऊन गंभीर यांनी संजू सॅमसनला बाहेर ठेवण्यासाठी एक उत्तम चाल खेळलीये, असे चित्रही या निवडीनंतर निर्माण झाले. पण संजूचा सातत्यपूर्ण कामगिरीमुळे हा डाव फसणार असल्याचे दिसते. दुसरीकडे सूर्युकमार यादवसाठी याआधीचा संघ कायम निर्णय घेणंही सोपा होईल.
संजूचा धमाका कडक शतकी खेळीनंतर दोन अर्धशतकासह वेधलं लक्ष
केरळा लीग स्पर्धेतील १५ व्या सामन्यात कोच्ची ब्लू टायगर्स संघाच्या डावाची सुरुवात करताना संजू सॅमसन याने अदानी त्रिवेंद्रम रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात ६२ धावांची धमाकेदार इनिंग खेळली. ४ चौकार आणि ५ षटकारांसह बहरलेल्या या खेळीत त्याने १६७.५७ च्या सरासरीने धावा कुटल्या. याआधी Thrissur Titans विरुद्धच्या सामन्यात संजूच्या भात्यातून ४६ चेंडूत ८९ धावांची खेळी पाहायला मिळाली होती. यात त्याे ९ उत्तुंग षटकारासह ४ चौकार मारले होते. Aries Kollam Sailors च्या सामन्यात त्याने ५१ चेंडूत १२१ धावांची खेळी केली होती. या तिन्ही खेळी त्याने डावाची सुरुवात करताना केल्या आहेत.
Web Title: Sanju Samson three Consecutive Fifties As Opener KCL 2025 Kochi Blue Tigers Kerala Cricket League Asia Cup Opening Slot Gautam Gambhir
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.