Join us

आधी लोकल लीग स्पर्धा गाजवली, आता ICC रँकिंगमध्येही कमाल! तरीही संजू रिस्क झोनमध्येच; कारण..

सलामीला शुबमन गिल तर लोअर मिडल ऑर्डरमध्ये जितेश शर्मासोबत टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 16:41 IST

Open in App

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या यूएईतील मैदानात खेळवण्यात येत असलेल्या आशिया चषक स्पर्धेसाठी दुबईत आहे. यजमान यूएई विरुद्धच्या सलामीच्या लढतीआधी संजू सॅमसन चर्चेत आहे. या सामन्यासह आशिया कप स्पर्धेत त्याला सलामीवीराच्या रुपात प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणार का? हा विषय आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाल्यापासून चर्चेत आहे. या स्पर्धेआधी लोकल स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केल्यावर आता संजू सॅमसन याने ICC च्या टी-२० मधील फलंदाजांच्या क्रमवारीत मुंसडी मारलीये.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

संजू सॅमसनची ICC रँकिंगमध्ये कमाल

आशिया चषक स्पर्धेत प्लेइंग इलेव्हनमधील स्थान तळ्यात मळ्यात असताना आयसीसीच्या नव्या टी-२० क्रमवारीत संजू सॅमसन याने  आपल्या रँकिंगमध्ये सुधारणा केलीये. संजू ५६६ रेटिंग पॉइंट्स मिळवत आता ३४ व्या स्थानावर पोहचला. टी-२० कारकिर्दीत आणखी उंच उडी मारण्यासाठी टीम इंडियात त्याला संधी  मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल.

भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा

सलामीवीराच्या रुपात दाखवलीये धमक, पण...

संजू सॅमसन याने मागील वर्षी भारतीय टी-२० संघातून सलामीला संधी मिळाल्यावर कमालीची कामगिरी केली होती. घरच्या मैदानातील बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतील धमाकेदार शतकी खेळीसह त्याने बॅक टू बॅक शतकी शोसह दक्षिण आफ्रिका दौराही गाजवला होता.  पण आता शुबमन गिल पुन्हा टी-२० संघात आल्यामुळे संजूला हा स्लॉट मिळणं मुश्किल वाटते. दोघांच्या कामगिरीची तुलना केली तर संजू सॅमसन स्ट्राइक रेटच्या बाबतीत शुबमन गिलवर भारी पडतो. पण असे असले तरी उप-कर्णधार असल्यामुळे शुबमन गिललाच सलामीवीराच्या रुपात पंसती मिळेल, असे चित्र दिसते. 

सलामीला शुबमन गिल तर लोअर मिडल ऑर्डरमध्ये जितेश शर्मासोबत टक्कर

मागील काही सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही संजू सॅमसन रिस्क झोनमध्येच आहे. सलामीच्या बॅटरच्या रुपात त्याची टक्कर थेट शुबमन गिलशी आहे. दुसरीकडे विकेट किपर बॅटरच्या रुपात लोअर मिडल ऑर्डरमध्ये जितेश शर्मा त्याला टक्कर देतोय. संजूची एकंदरीत कामगिरी पाहाता सलामीवीराच्या रुपात तो अधिक प्रभावी ठरलाय. आशिया कप स्पर्धेत टीम मॅनेजमेंट त्याचा कशापद्धतीने वापर करणार? यावरूनच तो आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या प्लॅनचा भाग आहे की नाही त्याचीही एक हिंट मिळेल.

टॅग्स :संजू सॅमसनआयसीसीभारतीय क्रिकेट संघआशिया कप २०२५एशिया कपशुभमन गिलजितेश शर्मा