Join us

Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

धावांचा पाठलाग करताना रिंकूच्या संघानं ३८ धावांवर गमावल्या ४ विकेट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 11:29 IST

Open in App

Rinku Singh Smashes Century In UP T20 League 2025 : आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या रिंकू सिंहनं UP T20 League मध्ये दमदार खेळीचा नजराणा पेश केलाय. या लीगमध्ये मेरठ मावेरिक्स (Meerut Mavericks) संघाचे नेतृत्व करणाऱ्या रिंकूनं गौर गोरखपूर लायन्स विरुद्धच्या सामन्यात षटकारांची आतषबाजी करत २२५ च्या स्ट्राइक रेटनं धावा कुटल्याचे पाहायला मिळाले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

धावांचा पाठलाग करताना रिंकूच्या संघानं ३८ धावांवर गमावल्या ४ विकेट्स

लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात गोरखूपर लायन्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १६७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मेरठ मेवरिक्स संघाची सुरुवात खराब झाली. आकाश दुबे आणि स्वास्तिक चिकारा स्वस्तात माघारी फिरल्यावर ऋतुराज शर्मा आणि  माधव कौशिक जोडीही फ्लॉप ठरली. अवघ्या ३८ धावांत रिंकूच्या संघानं ४ विकेट्स गमावल्या होत्या.

CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)

रिंकूनं पेश केला फटकेबाजीचा खास नजराणा; ४८ चेंडूत कुटल्या १०८ धावा 

संघ संकटात असताना रिंकू सिंह याने आपल्या भात्यातील फटकेबाजीचा खास नजराणा पेश करत ४८ चेंडूत १०८ धावा कुटल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ८ षटकार मारले. २२५ च्या स्ट्राइक रेटनं स्फोटक खेळी करत रिंकून संघाला अडचणीतून बाहेर काढत सामना जिंकून दिला.

आशिया कप स्पर्धेत प्लेइंग इलेव्हनमधील दावेदारी पक्की करणारी खेळी

आशिया कप स्पर्धेसाठी रिंकू सिंह याची भारतीय संघात निवड झालीये. पण या स्पर्धेत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठीही तगडी फाईट आहे. युपी टी-२० लीगमधील वादळी शतकी खेळीसह रिंकू सिंहनं आगामी स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आपली दावेदारी भक्कम केली आहे.  

भारतीय संघाकडून कशी राहिलीये कामगिरी?

रिंकू सिंह याने २०२३ मध्ये भारतीय संघाकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने ३३ सामने खेळले असून ३ अर्धशतकासह त्याच्या खात्यात ५४६ धावा जमा आहेत. ६९ ही टीम इंडियाकडून केलेली त्याची सर्वोत्तम खेळी आहे. 

टॅग्स :रिंकू सिंगटी-20 क्रिकेटएशिया कप 2023भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ