धरमशालाच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पंजाब किंग्सचा धुव्वा उडवत दिमाखदार विजयासह प्लेऑफ्सचं तिकीट पक्के केले. सलग सहाव्या पराभवामुळे पंजाब किंग्सचा संघ स्पर्धेबाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने दुखापतग्रस्त कर्णधार रजत पाटीदारच्या जागी व्यंकटेश अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. एवढेच नाही तर त्याला फलंदाजीत चौथ्या क्रमांकावर बढती मिळाली. या संधीच सोनं करताना या पठ्ठ्यानं ४० चेंजूत ७३ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याच्या दमदार खेळीशिवाय त्याने अर्धशतकी खेळीनंतर 'थलपती विजय' स्टाईल सेलिब्रेशन करत सर्वांचे लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
व्यंकटेश अय्यरचा धमाकेदार शो; ‘थलपती विजय’ स्टाईल सेलिब्रेशन चर्चेत
पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात देवदत्त पडिक्कल बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर आलेल्या व्यंकटेश अय्यरने आक्रमक फलंदाजी करत पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने अवघ्या २९ चेंडूत अर्धशतक झळकावलं. त्यानंतर दक्षिणात्य सुपरस्टार विजय अर्थात ‘थलपती विजय’च्या प्रसिद्ध 'मर्सल' या तमिळ चित्रपटातील स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केलं. विजयचा हात छातीवर क्रॉस करण्याचा हा अंदाज तमिळनाडूसह दक्षिण भारतात खूप लोकप्रिय आहे.
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
KKR नं रिलीज केल्यावर RCB नं दाखवला विश्वास
व्यंकटेश अय्यर हा आयपीएलमधील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. २०२५ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने या अष्टपैलू खेळाडूसाठी २३.७५ कोटी रुपये मोजले होते. पण तो सपशेल अपयशी ठरला. केकेआरनं यंदाच्या हंगामाआधी त्याला रिलीज केले. RCB नं ७ कोटी रुपयांसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. सुरुवातीच्या काळात इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात तो या संघाकडूनही छाप सोडण्यात अपयशी ठरला. पण पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात तो अखेर चमकला. त्यामुळे आगामी सामन्यात त्याच्यावर संघ भरवसा दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.