कसोटी क्रिकेट संघाचा मध्यफळीतील आधारस्तंभ असलेल्या किंग कोहलीनं छोट्या आणि मोठ्या फॉर्मेटमध्ये निवृत्ती घेत फक्त वनडेवर फोकस करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेआधी रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनं कसोटीतून निवृत्तीचा घेतलेला निर्णय अनेकांना आश्चर्यचकित करुन सोडणार आहे. दोन दिग्गजांच्या निर्णयानंतर बीसीसीआयला आता सलामीवीरासह चौथ्या क्रमांकासाठी उत्तम पर्याय निवडावा लागणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियासाठी ही देखील एक मोठी कसोटीच असेल. इथं जाणून घेऊयात कोण ठरू शकते किंग कोहलीचा सर्वोत्तम पर्याय त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विराट कोहलीने १२३ कसोटी सामन्यातील ९८ सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं ७५६४ धावा काढल्या आहेत. सातत्यपूर्ण कामगिरीसह अशी छाप सोडणे ही काही सोपी गोष्ट नाही. श्रेयस अय्यर हा चौथ्या क्रमांकासाठी टीम इंडियासाठी एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. अय्यरने नोव्हेंबर २०२१ मध्ये कानपूरच्या मैदानातून न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीत पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने १४ कसोटी सामन्यातील २४ डावात ३६.८६ च्या सरासरीसह ८११ धावा केल्या आहेत. यात एका शतकासह पाच अर्धशतकांचा समावेश आहे. आतापर्यंत तो पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहायला मिळाले आहे. कोहलीच्या निवृत्तीनंतर तो चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकते.
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
शुभमन गिल
शुबमन गिल हा कॅप्टन्सीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. तो देखील विराट कोहलीच्या जागी चौथ्या क्रमांकासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आतापर्यंत शुबमन गिल सलामीसह तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहायला मिळाले आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत लोकेश राहुल सलामीसह तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसले होते. हाच प्रयोग कायम ठेवत शुबमन गिल चौथ्या क्रमांकाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणार का? ते पाहण्याजोगे असेल. त्याला वैयक्तिक तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीत रस दिसतो. या परिस्थितीत लोकेश राहुलचा पर्यायही आजमावता येऊ शकेल.
सरफराज खान
सरफराज खान याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्यातील धमक दाखवली आहे. ६ कसोटी सामन्यात त्याला फक्त एकदा चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली आहे. चौथ्या क्रमांकावर खेळतानाच बंगळुरुच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्ध त्याच्या भात्यातून १५० धावांची खेळी पाहायला मिळाली होती. त्यामुळे हा देखील एक पर्याय टीम इंडियासमोर असेल.