Sanju Samson Hit Show Ahead Of Asia Cup : आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळाली, पण संजू सॅमसन प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवणार का? हा प्रश्न चर्चेचा विषय ठरत आहे. भारतीय टी-२० संघात शुबमन गिलची एन्ट्री झाल्यामुळे संजू सॅमसनचं स्थान धोक्यात आलं आहे, असे बोलले जात आहे. पण आशिया कप स्पर्धेआधी धमाकेदार इनिंगसह संजू सॅमसन याने ओपनरच्या रुपात आपली दावेदारी भक्कम केलीये. केरळा प्रीमियर लीग स्पर्धेतील सामन्यात भारतीय विकेट किपरनं षटकार अन् चौकारांची आतषबाजी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ओपनिंगला संधी मिळताच मारली सेंच्युरी
केरळा क्रिकेट लीगमध्ये संजू सॅमसन कोच्ची ब्लू टायगर्स संघाकडून खेळताना दिसतोय. पहिल्या सामन्यात त्याने डावाची सुरुवात केली नव्हती. त्यामुळे बॅटिंगचा नंबरच आला नाही. दुसऱ्या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना १३ चेंडूत त्याने २२ धावांची खेळी केल्याचे पाहायला मिळाले. तिसऱ्या सामन्यात तो सलामीला आला. यावेळी त्याने ५१ चेंडूत २३७.२५ च्या स्ट्राइकरेटसह १२१ धावांची खेळी केली होती. यात १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.
'फॅट टू फिट' सरफराज खानची 'वजनदार' कामगिरी; दुसऱ्या सेंच्युरीसह आठवडा गाजवला!
सलग दुसरी सेंच्युरी हुकली, पण...
संजू सॅमसन याने थ्रिसूर टायटन्स विरुद्धच्या चौथ्या सामन्यात ४६ चेंडूत ८९ धावांची खेळी केली. या खेळीत त्याच्या भात्यातून ४ चौकार आणि ९ षटकार पाहायला मिळाले. सलग दुसरी सेंच्युरी झळकवण्याचा डाव ११ धावांनी हुकला. पण एका चेंडूत १३ धावा कुटत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सिजोमन जोसेफ याच्या गोलंदाजीवर नो बॉलवर मारलेला षटकार आणि त्यानंतर फ्री हीट मिळाल्यावर पुन्हा उत्तुंग फटका मारत संजून एका चेंडूत १३ धावांचा डाव साधला.
Web Title: One Ball Two Sixes 13 Runs Sanju Samson Miss Century Unthinkable Ahead Of Asia Cup Watch
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.