Join us

MI vs DC WPL Final 2025 : फायनल मॅच आधी नोरा दाखवणार तोरा!

एका बाजूला फायनल मॅचमध्ये कोणत्या महिला खेळाडूंचा जलवा दिणार ही गोष्ट चर्चेत असताना दुसऱ्या बाजूला बॅॉलिवूड अभिनेत्री अन् नृत्यांगणा नोरा फतेही पिक्चरमध्ये आलीये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 13:26 IST

Open in App

महिला प्रीमियर लीग (WPL) २०२५ च्या तिसऱ्या हंगामातील फायनलसाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ सज्ज आहेत.  मुंबईतील ब्रेबोर्न स्टेडियमवर रंगणाऱ्या सामन्यासह हरमनप्रीत कौरचा संघ दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकणार की, फायनलमधील पराभवाची मालिका खंडीत करत दिल्ली कॅपिटल्स बाजी मारणार? यासंदर्भात क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. एका बाजूला फायनल मॅचमध्ये कोणत्या महिला खेळाडूंचा जलवा दिणार ही गोष्ट चर्चेत असताना दुसऱ्या बाजूला बॅॉलिवूड अभिनेत्री अन् लोकप्रिय डान्सर नोरा फतेही पिक्चरमध्ये आलीये.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

WPL फायनल आधी दिसणार नोराचा तोरा 

WPL समारोप समारंभातील कार्यक्रमात नोरा फतेही आपल्या परफॉमन्सनं स्टेजवर आग लावण्यासाठी तयार आहे. डब्लूपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून यासंदर्भात एक पोस्ट शेअर करण्यात आलीये. फायनल मॅच आधी खास मोहाल निर्माण करण्यासाठी नोरा फतेही क्रिकेट चाहत्यांसमोर खास परफॉमन्स सादर करणार आहे, अशा आशयाचा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आलाय. 

बॉलिवूडमधील लोकप्रिय चेहरा ठरलीये नोरा 

३३ वर्षी नोरा फतेही कॅनेडात जन्मली असली तरी बॅॉलिवूडमध्ये तिने आपली एक विशेष छाप सोडल्याचे पाहायला मिळते. अभिनेत्री, नृत्यांगणा आणि गायिका अशा बहुमुखी कलेसह तिने मोठा चाहतावर्ग कमावला आहे. 'सत्यमेव जयते के' या चित्रपटातील "दिलबर" आणि  'स्त्री' चित्रपटातील "कमरिया" या आयटम साँगनं तिने चाहत्यांना अक्षरश: वेड लावले होते. महिला प्रीमियर लीगच्या खास कार्यक्रमात रंग भरुन पुन्हा एकदा मैफिल लुटण्यासाठी ती कोणता परफॉमन्स सादर करणार ते पाहण्याजोगे असेल.

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुसरी फायनल

महिला प्रीमियर लीगच्या आतापर्यंत तिन्ही फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्स खेळताना दिसलीये. पण आतापर्यंत त्यांना एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. २०२३ च्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातच फायनल खेळवली गेली होती. ज्यात मुंबई इंडियन्स महिला संघानं बाजी मारली होती. आता या पराभवाची परतफेड करून  तिसऱ्या प्रयत्नात पहिले जेतेपद उंचावण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्रयत्नशील असेल. दुसरीकडे हरमनप्रीत कौरचा संघ पहिल्या हंगामातील पुनरावृत्ती करून दुसरी ट्रॉफी जिंकत इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.  

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगनोरा फतेहीहरनमप्रीत कौरमुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स