ICC's T20 World Cup Team Of The Tournament : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्या OUT; संजूसह भारताच्या चौघांची वर्णी

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या संघातील किती खेळाडू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 00:09 IST2026-03-10T00:06:38+5:302026-03-10T00:09:11+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
No Suryakumar Yadav In ICC's T20 World Cup Team Of The Tournament Sanju Samson Jasprit Ishan Kishan Hardik Pandya Get Place Who Is Captain | ICC's T20 World Cup Team Of The Tournament : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्या OUT; संजूसह भारताच्या चौघांची वर्णी

ICC's T20 World Cup Team Of The Tournament : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्या OUT; संजूसह भारताच्या चौघांची वर्णी

टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेची सांगता झाल्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आपल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. या संघात संजू सॅमसनसह चार भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. पण भारतीय संघाला विक्रमी जेतेपद मिळवून देणाऱ्या सूर्य कुमार यादवची या संघात वर्णी लागलेली नाही. इथं जाणून घेऊयात आयसीसीने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या संघातील किती खेळाडूंचा समावेश आहे. या संघाचे नेतृत्वाच्या रुपात कुणाला पसंती देण्यात आली आहे? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

संजूच्या जोडीला पाकिस्तानच्या बॅटरला सलामीला पसंती

ICC ने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्कमच्या नेतृत्वाखालील सर्वोत्तम संघ निवडला आहे. भारताच्या संजू सॅमसनसह ईशान किशन, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह या चौघांचा समावेश आहे. ५ डावात ३२१ धावांसह टीम इंडियाला जेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या संजूला सलामीवीर यष्टीरक्षकाच्या रुपात संधी देण्यात आली आहे. त्याच्या जोडीदाराच्या रुपात ICC नं पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानची निवड केली आहे. त्याने यंदाच्या हंगामात ६ डावात सर्वाधिक ३८३ धावा केल्या होत्या. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात एका हंगामात कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्याही ठरली.

T20 World Cup 2026 स्पर्धेतील ५ वादग्रस्त घटना; IND vs NZ यांच्यातील फायनलमध्येही दिसली 'टशन'

ईशान किशनसह हार्दिक पांड्याचा जलवा

ईशान किशन याने यंदाच्या हंगामात ३१७ धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर राहिला. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाच्या बॅटरच्या रुपात ICC नं त्याला आपल्या संघात घेतलं आहे. याशिवाय हार्दिक पांड्याला सर्वोत्तम अष्टपैलूच्या रुपात या संघात स्थान देण्यात आले आहे. पांड्याने दोन अर्धशकासह यंदाच्या हंगामात ९ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले.

 बुमराहनं साधला होता संयुक्तरित्या सर्वाधिक विकेट्स घेण्याचा डाव  

जसप्रीत बुमराहनं ८ सामन्यात १४ विकेट्सचा डाव साधत यंदाच्या हंगामात संयुक्तरित्या सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याच्या बरोबरीनं भारताचाच फिरकीपटून वरुण चक्रवर्तीने ९ डावात १४ विकेट्स घेतल्या. पण या फिरकीपटूला ICC च्या संघात स्थान मिळवता आलेले नाही. 

आयसीसी पुरुष टी २० वर्ल्ड कप २०२६ सर्वोत्तम संघ

 साहिबजादा फरहान (पाकिस्तान), संजू सॅमसन (भारत, यष्टीरक्षक बॅटर), ईशान किशन (भारत), एडन मार्करम (द.आफ्रिका, कर्णधार), हार्दिक पांड्या (भारत), विल जॅक्स (इंग्लंड), जेसन होल्डर (वेस्ट इंडिज), जसप्रीत बुमराह (भारत), लुंगी एनिग्डी (द.आफ्रिका) आदिल राशिद (इंग्लंड), ब्लेसिंग मुजरबानी (झिम्बाब्वे), शॅडली वॅन शॉकविक ( अमेरिका,बारावा खेळाडू)

Web Title : आईसीसी टी20 विश्व कप टीम: सूर्या बाहर, चार भारतीय शामिल!

Web Summary : आईसीसी ने एडन मार्करम के नेतृत्व में टी20 विश्व कप टीम की घोषणा की। संजू सैमसन, ईशान किशन, हार्दिक पांड्या और जसप्रीत बुमराह को जगह मिली। भारत की जीत के बावजूद सूर्या कुमार यादव को बाहर रखा गया।

Web Title : ICC T20 World Cup Team: Surya Out, Four Indians In!

Web Summary : ICC announced its T20 World Cup team, led by Aiden Markram. Sanju Samson, Ishan Kishan, Hardik Pandya, and Jasprit Bumrah made the cut. Surya Kumar Yadav was surprisingly excluded despite India's victory.