भारतीय संघानं 2011साली वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. भारतीय संघानं वानखेडेवर झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवून 28 वर्षांची वन डे वर्ल्ड कप विजयाची प्रतीक्षा संपवली होती. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं तो वर्ल्ड कप उंचावला आणि यासह भारतीय संघाच्या नावावर असा विक्रम नोंदवला जो जगातला कोणताच संघ मोडू शकत नाही. भारतीय संघानं 1983नंतर 2011मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकला. तत्पूर्वी 2007मध्ये टीम इंडियानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकला
महेंद्र सिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
MS Dhoni Retirement: मै पल दो पल का शायर हूँ...! निवृत्ती जाहीर करताना MS Dhoniनं दिला 'खास' संदेश!
MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल' धोनीनं अखेर 'टफ' कॉल घेतला; संघाचं हित समजून निवृत्ती स्वीकारली
MS Dhoni Retirement: अशी कामगिरी करणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार
महेंद्रसिंग धोनीचे 'हे' दहा विक्रम मोडणे अशक्य!
भारताने पहिला वर्ल्ड कप कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली उंचावला. 1983साली लॉर्ड्स मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियानं दोन वेळचे विजेते वेस्ट इंडिजचा रथ अडवला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं 183 धावा उभ्या केल्या. कृष्णमचारी श्रीकांत ( 38), मोहिंदर अमरनाथ ( 26), संदीप पाटील ( 27) यांच्या खेळीनं टीम इंडियानं 54.4 षटकांत सर्वबाद 183 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 52 षटकांत 140 धावांत माघारी परतला. अमरनाथ आणि मदन लाल यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
त्यानंतर 2007मध्ये टीम इंडियानं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकला. पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात जोगींदर शर्मानं अखेरच्या षटकात टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 5 बाद 157 धावा केल्या, प्रत्युत्तरात पाकिस्तानला 19.3 षटकांत सर्वबाद 152 धावा केल्या. भारतानं पाच धावांनी हा सामना जिंकला. जोगिंदर शर्मानं अखेरच्या षटकात पाकिस्तानच्या मिसबाह-उल हकला बाद करून भारताला विजय मिळवून दिला.
या विजयाबरोबर टीम इंडियानं असा विक्रम नोंदवला की जो जगातला कोणताच संघ मोडू शकत नाही. भारतीय संघानं 60, 50 आणि 20 षटकांच्या क्रिकेटमधील वर्ल्ड कप जिंकले आहेत. जगात असा विक्रम करणारा भारत हा एकमेव संघ आहे.View this post on Instagram#msdhoni #teamindia #dhoni #msd #T20WorldCup
A post shared by Dhoni Super Fan Rambabu (@dhonisuperfan) on