MS Dhoni : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला मार्गदर्शन करण्यासाठी महेंद्रसिंग धोनी किती मानधन घेणार?; जय शाह यांनी सांगितला आकडा

Mentor MS Dhoni बीसीसीआयनं वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याची मेंटॉर म्हणून निवड केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 06:38 PM2021-10-12T18:38:37+5:302021-10-12T18:45:20+5:30

whatsapp join usJoin us
"MS Dhoni is not charging any honorarium for his services as the mentor of Indian team for the T20 World Cup," BCCI Secretary Jay Shah to ANI | MS Dhoni : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला मार्गदर्शन करण्यासाठी महेंद्रसिंग धोनी किती मानधन घेणार?; जय शाह यांनी सांगितला आकडा

MS Dhoni : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला मार्गदर्शन करण्यासाठी महेंद्रसिंग धोनी किती मानधन घेणार?; जय शाह यांनी सांगितला आकडा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, MS Dhoni : आयपीएल २०२१ अंतिम टप्प्यात आली आहे आणि १५ ऑक्टोबरच्या फायनलनंतर लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीची ( Virat Kohli) ही अखेरची स्पर्धा असणार आहे. त्यामुळेच आयसीसी जेतेपदांचा दुष्काळ संपवण्याचा विराटचा मानस नक्की असणार. त्यात बीसीसीआयनं वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याची मेंटॉर म्हणून निवड केली. धोनीची बुद्धी अन् कोहलीची आक्रमकता याचं समिकरण आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाहायला मिळेल. पण, बीसीसीआय मेंटॉर असणाऱ्या धोनीला किती मानधन देणार हे तुम्हाला माहित्येय का?

धोनीनं मागच्या वर्षी १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.  त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०११चा वन डे वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो जगातील पहिला व एकमेव कर्णधार आहे. महेंद्रसिंग धोनीनं ९० कसोटींत ४८७६ धावा केल्या आणि त्यात  ६ शतकं व ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. ३५० वन डेत १०७७३  धावा आणि त्यात १० शतकं व ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. ९८ ट्वेंटी-२०त त्याच्या नावावर १६१७ धावा आहेत.

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं IPL 2021च्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. धोनीचा अनुभव आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाच्या कामी येणार आहे. धोनीनं टीम इंडियाला मार्गदर्शन करण्यासाठी एकही रुपयाचं मानधन घेतलेलं नाही, अशी माहीती बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिली.

महेंद्रसिंग धोनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील Greatest कर्णधार - रवी शास्त्री
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही धोनीला मेंटॉर म्हणून निवडल्याच्या निर्णयाचे स्वागत केले होते. त्यांनी धोनीला सर्वोत्तम कर्णधार म्हणूनही संबोधले. ''धोनी हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधार आहे. आयसीसी स्पर्धांमधील तुम्ही त्याचे रेकॉर्ड्स पाहा. त्यानं काय जिंकलेलं नाही?, आयपीएल, चॅम्पियन्स लीग, आयसीसीच्या सर्व स्पर्धा, दोन वर्ल्ड कप, हे सर्व त्यानं जिंकलं आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्या आसपास कोणीच नाही. तो ग्रेटेस्ट आहे. तुम्ही त्याला किंग काँग म्हणू शकता,''असे मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

भारतीय संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व दीपक चहर 
 

Web Title: "MS Dhoni is not charging any honorarium for his services as the mentor of Indian team for the T20 World Cup," BCCI Secretary Jay Shah to ANI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.