IPL 2026: राजस्थानचं टेन्शन वाढलं, स्टार आलराउंडर सॅम करन यंदाच्या स्पर्धेत खेळणे कठीण!

Rajasthan Royals: आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 23:21 IST2026-03-19T23:19:39+5:302026-03-19T23:21:12+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Major Blow for Rajasthan Royals: Sam Curran Likely to Miss IPL 2026 Due to Thigh Injury | IPL 2026: राजस्थानचं टेन्शन वाढलं, स्टार आलराउंडर सॅम करन यंदाच्या स्पर्धेत खेळणे कठीण!

IPL 2026: राजस्थानचं टेन्शन वाढलं, स्टार आलराउंडर सॅम करन यंदाच्या स्पर्धेत खेळणे कठीण!

आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन याच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली असून, या दुखापतीमुळे त्याचे यंदाच्या स्पर्धेत खेळणे कठीण मानले जात आहे.

दरम्यान, २७ वर्षीय सॅम करन शेवटचा ५ मार्च रोजी आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंडकडून खेळताना दिसला होता. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा पराभव केला. तेव्हापासूनच करनच्या तंदुरुस्तीबाबत चर्चा रंगली होती. आयपीएलच्या लिलावात राजस्थान रॉयल्सने रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना चेन्नई सुपर किंग्सकडून आपल्या संघात घेतले होते. तर, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन चेन्नईमध्ये सामील झाला होता. करन पहिल्यांदाच राजस्थानकडून खेळणार असल्याने चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, अजूनही तो दुखापतीतून सावरला नसल्याचे समजत आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या रणनीतीला मोठा तडा बसला आहे.

सॅम करनची आयपीएलमधील कारकीर्द चढ-उताराची राहिली आहे. २०१९ मध्ये पंजाब किंग्समधून पदार्पण केल्यानंतर तो चेन्नईकडे गेला आणि पुन्हा २०२३ मध्ये १८.५ कोटी रुपयांच्या विक्रमी बोलीवर पंजाबमध्ये परतला. २०२५ मध्ये तो पुन्हा चेन्नईकडून खेळताना दिसला. मात्र, तो हंगाम त्याच्यासाठी निराशाजनक ठरला. त्याने ५ सामन्यांत केवळ ११४ धावा केल्या आणि फक्त एक विकेट मिळवली.

ईएसपीएनक्रिकइंफोच्या अहवालानुसार, राजस्थानने अद्याप अधिकृतपणे बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. मात्र, संघ व्यवस्थापन खालील पर्यायांचा विचार करू शकते. अनुभवी अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजावर आता मोठी जबाबदारी असेल. डोनोव्हान फरेराच्या रूपाने संघाकडे एक पॉवर-हिटर आणि उपयुक्त ऑफ-स्पिनरचा पर्याय उपलब्ध आहे. सॅम करनची अनुपस्थिती भरून काढणे राजस्थानसाठी मोठे आव्हान असणार आहे. आता राजस्थान रॉयल्स कोणाला बदली खेळाडू म्हणून संधी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : आईपीएल 2026: सैम करन की चोट से राजस्थान रॉयल्स की बढ़ी चिंता।

Web Summary : सैम करन की चोट ने राजस्थान रॉयल्स की चिंता बढ़ा दी है, जिससे आईपीएल 2026 में उनकी भागीदारी संदिग्ध है। उनकी अनुपस्थिति एक चुनौती है; प्रतिस्थापन विकल्पों पर विचार किया जा रहा है। जडेजा जिम्मेदारी संभाल सकते हैं।

Web Title : IPL 2026: Rajasthan Royals worried as Sam Curran faces injury concern.

Web Summary : Rajasthan Royals face concern as Sam Curran's injury casts doubt on his IPL 2026 participation. His absence poses a challenge; replacement options are being considered. Jadeja might take responsibility.