IND vs BAN : 'खेळ मांडला'! सूर्या-गंभीर जोडीला संजूवर भरवसा नाय काय?

IND vs BAN : 'खेळ मांडला'! सूर्या-गंभीर जोडीला संजूवर भरवसा नाय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 00:26 IST2025-09-24T23:28:13+5:302025-09-25T00:26:03+5:30

whatsapp join usJoin us
Lack of trust in Sanju Samson? Gambhir & Suryakumar play wicketkeeper at No. 8 in IND vs BAN match | IND vs BAN : 'खेळ मांडला'! सूर्या-गंभीर जोडीला संजूवर भरवसा नाय काय?

IND vs BAN : 'खेळ मांडला'! सूर्या-गंभीर जोडीला संजूवर भरवसा नाय काय?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Lack of trust in Sanju Samson? Gambhir :आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ दमदार कामगिरी करताना दिसतोय. पण संजू सॅमसनची अवस्था ही फुल टाइम विकेटकिपर अन् पार्ट टाइम बॅटर अशी काहीशी झालीये. शुबमन गिलनं वर्षभरानंतर टीम इंडियात एन्ट्री झाल्यावर संजूला सलामीला संधी मिळणार नाही हे चित्र आधीच स्पष्ट झाले होते. पण आता बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात संजूू सॅमसनला थेट ८ व्या क्रमांकावर ढकलण्यात आले. त्यामुळे तो बॅटिंगलाच आला नाही. त्यामुळे कोच गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवला त्याच्यावर भरवसा नाय काय? असा उपस्थितीत होतोय. सोशल मीडियावर त्यासंदर्भात चर्चाही रंगू लागली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

संजूच्या बॅटिंग ऑर्डरमधील अनिश्चितता

आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या पाच सामन्यातील प्रत्येक सामन्यात संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. पण फक्त दोन वेळाच तो बॅटिंगला आला. ओमान विरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ४० चेंडूत ५० धावांची खेळी केली होती. सुपर फोरमधील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यात आले. या सामन्यात त्याने १७ चेंडूत १३ धावा केल्या होत्या. 

अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला

पाचव्या क्रमांकावर खेळवण्याचे देण्यात आले होते संकेत, पण... 

बांगलादेश विरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन नील टेन डोशेटे यांनी संजू सॅमसनला पाचव्या क्रमांकावर खेळवण्याचे संकेत दिले होते. पण मॅच वेळी नवा प्रयोग पाहायला मिळाल. शिवम दुबेसहअक्षर पटेलला त्याच्या आधी फलंदाजीला पाठवण्यात आले. हा प्रयोग फसवा ठरला. त्यामुळे संजूसोबत प्लेइंग इलेव्हनमध्ये घेऊन अन्याय सुरु असल्याचे चित्रही निर्माण झाले आहे. 

जो प्रयोग केला तो फसवा ठरला 

शिवम दुबे हा सध्याच्या संघात एक परफेक्ट ऑलराउंडर आहे. त्याच्यात मोठी फटकेबाजी करण्याची क्षमताही आहे. पण गोलंदाजीत चमकत असताना त्याची फलंदाजी फिकी पडल्याचे दिसले. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाल्यावर तो फक्त २ धावा करून तंबूत परतला. सूर्यकुमार अवघ्या पाच धावा करून परतल्यावर तिलक वर्मालाही तेवढ्याच धावांवर बाद झाला. त्याला या सामन्यात दुहेरी आकडाही गाठता आला नाही. या दोघांच्यामध्ये हार्दिक पांड्या बॅटिंगला आल्याचे पाहायला मिळाले. एवढेच काय तर अक्षर पटेलचा प्रयोगही झाला. त्यात संजू बॅटिंगला आला नाही. 

 

Web Title: Lack of trust in Sanju Samson? Gambhir & Suryakumar play wicketkeeper at No. 8 in IND vs BAN match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.