Ireland Women's ODI Tour Of India : वेस्टइंडिज विरुद्धच्या घरच्या मैदानातील वनडे मालिकेत ३-० असा दिमाखदार विजयासह वर्षाचा शेवट गोड करणारा रा भारतीय महिला क्रिकेट संघ आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसह नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे. १० जानेवारी, २०२५ पासून राजकोच्या मैदानात भारत आयर्लंड महिला संघातील द्विपक्षीय वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. आयर्लंडचा संघ पहिल्यांदाच भारतीय महिलांसोबत मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! नियमित कॅप्टन हरमनप्रीत कौरसह रेणुकाला विश्रांती, स्मृती मानधनाला मिळाली कॅप्टन्सी (Smriti Mandhana Lead Team India Women Squad )
आयर्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्यासह जलदगती गोलंदाज रेणुका सिंह ठाकूर हिला घरच्या मैदानातील वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आलीये. स्मृती मानधना या मालिकेत १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
आयर्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ (Team India Women Squad Agianst Ireland ODI Series )
स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उप कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रोड्रिग्स, उमा छेत्री (विकेटकीपर/बॅटर), ऋचा घोष (विकेटकीपर/बॅटर), तेजल हसबनीस, राघवी बिस्ट, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तितास साधू , साइमा ठाकोर, सयाली सतघरे.
भारत-आयर्लंड यांच्यातील वनडे मालिकेचे वेळापत्रक (Ireland Women's ODI Tour Of India Schedule And Time Table)
- पहिला वनडे सामना १० जानेवारी
- दुसरा वनडे सामना १२ जानेवारी
- तिसरा वनडे सामना १५ जानेवारी
(वनडे मालिकेतील सर्व सामने राजकोटच्या मैदानात खेळवण्यात येणार असून सकाळी ११ वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल.)
भारत-आयर्लंड वनडे मालिकेतील सामने कुठे पाहता येतील? (Ireland Women's ODI Tour Of India Live Streaming Details)
भारत विरुद्ध आयर्लंड महिला क्रिकेट संघातील वनडे मालिकेतील सर्व सामन्यांचे Sports18 नेटवर्क टीव्ही चॅनेलवर थेट प्रेक्षपण करण्यात येणार आहे. याशिवाय जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटद्वारे चाहत्यांना या सामन्यांचा आनंद घेता येईल.