Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup 2026 : बांगलादेशचा 'ग्रुप स्वॅप'चा डाव फसला? आयर्लंडनं दाखवला ठेंगा; नेमकं काय घडलं?

बांगलादेशच्या संघाने ICC चा दरवाजा  ठोठावला, पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 15:33 IST

Open in App

Cricket Ireland Is Not Ready To Swap Group With Bangladesh In T20 World Cup 2026 : टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेआधी बांगलादेश क्रिकेट बोर्डाची नौटंकी सुरु आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थितीत करून  बांगलादेशचा संघ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आपले सामने भारतीय मैदानाऐवजी श्रीलंकेत खेळवण्यासाठी जोर लावत आहे. ICC कडे त्यांनी तशी मागणीही केली. पण स्पर्धा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना हा बदल शक्य नाही, असे सांगत ICC नं त्यांची मागणी फेटाळली आहे. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डानं ICC कडे नवा प्रस्ताव ठेवला. शेड्युलमध्ये बदल न करता ग्रुप स्वॅपचा डाव खेळण्यात आला. पण त्यांचा हा डावही फसल्याचे समोर येत आहे. कारण त्यांनी ज्या आयर्लंड संघाच्या जागी 'ग्रुप स्वॅप'चा प्रस्ताव ठेवला आहे, ते यासाठी राजी नाहीत. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

बांगलादेशनं खेळलेला हा डावही ठरला फसवा!

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशचा संघ हा 'क' गटात आहे. या गटातील सर्व सामने भारतीय मैदानात खेळवण्यात येणार आहेत. दुसरीकडे आयर्लंडचा संघ 'ब' गटात असून त्यांचे सर्व सामने श्रीलंकेच्या मैदानात नियोजित आहेत.  बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयर्लंडच्या जागी आपल्या संघाचा समावेश 'क' गटातून 'ब' गटात करावा, जेणेकरुन सर्व सामने श्रीलंकेत खेळवले जातील, अशी विनंती आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे केली आहे. यावर ICC काय निर्णय घेणार ते अजून गुलदस्त्यातच आहे. पण आयर्लंड क्रिकेट बोर्डाने यावर दिलेली प्रतिक्रिया बांगलादेशचा हा डावही फसवा ठरल्याचे संकेत देणारा आहे.    

किंग कोहली ‘ब्लॅक वॉटर’ पितो; टीम इंडियाचा प्रिन्स चक्क लाखोंचा वॉटर प्युरीफायर सोबत घेऊन फिरतो!

बांगलादेशचा हा डावही फसला? आयर्लंड क्रिकेट बोर्डानं दाखवला ठेंगा!

क्रिकबझच्या वृत्तानुसार,  आयर्लंड क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने 'ग्रुप स्वॅप' संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली आहे. आमच्या वर्ल्ड कप शेड्यूलमध्ये कोणताही बदल होणार नाही, अशी हमी आम्हाला देण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही आमचे सर्व साखळी फेरीतील सामने हे श्रीलंकेच्या मैदानातच खेळू, असे आयर्लंड क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने ठामपणे सांगितले आहे. हे वक्तव्य म्हणजे आयर्लंडच्या संघाने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला ठेंगा दाखवल्याप्रमाणेच आहे. 

बांगलादेशच्या संघाने ICC चा दरवाजा  ठोठावला, पण... 

बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याच्याराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर BCCI नं मुस्तफिझुर रहमान याला IPL मधून बाहेरचा रस्ता दाखवला. बीसीसीआयच्या या भूमिकेनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतीय मैदानात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने खेळणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थितीत करत त्यांनी ICC कडेही धाव घेतली. पण तिथं त्यांची डाळ काही शिजलेली नाही. लवकरच ICC या मुद्यावर अंतिम निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.   

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladesh's T20 World Cup Group Swap Fails as Ireland Refuses

Web Summary : Bangladesh's attempt to swap groups for T20 World Cup 2026, aiming to play in Sri Lanka instead of India citing security concerns, has been rejected by Ireland. Ireland insists on sticking to their schedule in Sri Lanka.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2026भारत विरुद्ध बांगलादेशभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघआयसीसी